सिद्धांतनं 15 वर्षांचं लग्न मोडून थाटला होता रश...

सिद्धांतनं 15 वर्षांचं लग्न मोडून थाटला होता रशियन मॉडेलशी संसार… (Siddhaanth Vir Surryavanshi has been married twice, After divorce to first wife, He found love again In super model Alesia Raut)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झालं. जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने टीव्ही जगताला मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकून सर्व स्टार्स आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सिद्धांत सूर्यवंशी गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होता. घराघरात सुपरिचित होता.

पाच वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सिद्धांतने दोन लग्न केली होती. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव इरा सूर्यवंशी आहे. जवळपास १५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. २०१५ मध्ये हे जोडपे वेगळे झाले.

घटस्फोटानंतर दोन वर्षांनी सिद्धांतला रशियन मॉडेल आणि अभिनेत्री भेटली. २०१७ मध्ये त्याने रशियन मॉडेल रशियन मॉडेल अलेसियाशी दुसरं लग्न केलं. सिद्धांतप्रमाणेच अलेसियाचंही हे दुसरे लग्न होतं. तिचे आधी अलेक्झांडर यानोव्स्कीशी लग्न झाले होते पण काही काळानंतर दोघे वेगळे झाले.

अलेसियाला पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे. तिचं मॉडलिंगच्या जगतात खूप नाव आहे. ती एक फॅशन कोरिओग्राफर देखील आहे. टीव्हीच्या अनेक रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली आहे. रोहित शेट्टीच्या फियर फॅक्टर खतरों के खिलाडी सीझन 4 मध्ये देखील तिने भाग घेतला होता. सिद्धांतलाही दोन मुले आहेत. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून दीजा नावाची मुलगी आहे जी १८ वर्षांची आहे. तर त्याला दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा आहे.