सिद्धार्थ सूर्यवंशीच्या आठवणीत पत्नी ॲलिसियाची ...

सिद्धार्थ सूर्यवंशीच्या आठवणीत पत्नी ॲलिसियाची भावूक पोस्ट… ; लिहिले- ‘मी जिवंत असेपर्यंत…’ (Siddhaanth Surryavanshi’s wife Alesia Raut pens heartfelt note after his demise, says ‘will love you till I am alive’)

टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं या जगातून आकस्मिक जाणं इंडस्ट्रीसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. सिद्धांतच्या पश्चात पत्नी ॲलिसिया राऊत आणि दोन मुले आहेत. यावेळी त्याच्या कुटुंबासाठी हा सर्वात कठीण काळ आहे, विशेषत: त्याची पत्नी ॲलिसिया तिच्या पतीच्या मृत्यूने खचून गेली आहे. सिद्धार्थला गमावल्यानंतर, तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पहिली पोस्ट ती त्याला किती मिस करत आहे हे दर्शवते.

सिद्धार्थच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर, ॲलिसियाने सिद्धांतला भेटल्याचा पहिला फोटो शेअर करताना एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे.  ही पोस्ट वाचून चाहत्यांच्या पापण्याही ओलावल्याशिवाय राहणार नाहीत. सिद्धार्थची आठवण करून देताना ॲलिसियाने लिहिले की, “मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यावर प्रेम करेन. २४ फेब्रुवारी २०१७… आपल्या दोघांचा पहिल्यांदाच एकत्र काढलेला हा फोटो. या दिवसापासून तुला माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य बघायचं होतं. मी आयुष्यावर भरभरून प्रेम करावं, नव्या गोष्टी शिकाव्यात यासाठी तू नेहमीच प्रेरणा द्यायचा.’

‘मी वेळेवर जेवावं यासाठी तू नेहमी आग्रही असायचा. कोणत्याही भितीशिवाय माझा हात धरणारा तू एकमेव होतास. तुझं हास्य, तुझ्या डोळ्यांतील प्रेम, तू व्यक्त केलेली काळजी नेहमीच मला, मार्कला आणि डिझाला आठवेल. प्रेमळ मुलगा, प्रेमळ भाऊ, प्रेमळ पिता, प्रेमळ पती, प्रेमळ मित्र.. तुझ्यावर सदैव खूप प्रेम करेन’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

ॲलिसियाची ही पोस्ट वाचून चाहते भावूक होत आहेत. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत. प्रत्येकजण अॅलिसियाला धैर्य देत आहे.

ॲलिसिया ही सिद्धार्थची दुसरी पत्नी आहे. याआधी सिद्धार्थने इरा चौधरीशी लग्न केले, पण लग्नाच्या १५ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची  एक मुलगी आहे, जिने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. यानंतर सिद्धार्थने ॲलिसियाच्या आयुष्यात प्रवेश केला आणि दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. ॲलिसियाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा देखील आहे. पण लग्नानंतर अवघ्या पाचच वर्षांनी ॲलिसियाचा संसार उद्ध्वस्त झाला. ११ नोव्हेंबर रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.