श्वेता तिवारीची तरुण मुलगी पलक तिवारीचे ग्लॅमरस...

श्वेता तिवारीची तरुण मुलगी पलक तिवारीचे ग्लॅमरस फोटो बघून चाहते चक्रावले (Shweta Tiwari’s Daughter Palak shares Her Latest Photos, Fans Gets Crazy After Seen Her Glamorous Style)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सून श्वेता तिवारी सध्या आपल्या कुटुंबापासून दूर केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु तेथील आपले फोटो आणि व्हिडिओज्‌ ती दररोज शेअर करत आहे. या दरम्यान श्वेता तिवारीची लाडकी लेक पलकचे आत्ताचे काही फोटो व्हायरल होत आहेत. पलकचा या फोटोंमधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते चक्रावले आहेत.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची खबर आहे. पण त्यापूर्वीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची झुंबड पाहावयास मिळत आहे. पलक सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते आणि वेळोवेळी आपले फोटो आणि व्हिडिओज्‌ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिने आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर चाहत्यांनी पलकच्या सौंदर्याची भरपूर प्रशंसा केली आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

पलक तिवारीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. शिवाय तिने यांस कॅप्शन दिली आहे. त्यात तिनं ‘वूप्‌स ती परत आली आहे !!! आणि आत्तापर्यंतच्या सर्वात अद्‌भूत टीमसोबत तिने काम केलं आहे.’ असं लिहिलं आहे. आपल्या लेकीच्या या पोस्टवर आई श्वेता तिवारीने ‘ओ, माय गर्ल…’ अशी कमेंट पाठवली आहे. या छायाचित्रांमध्ये पलक वेगवेगळ्या अंदाजात दिसून आली आहे. तिची ही छायाचित्रे प्रदर्शित होताच हजारो लोकांनी ती पाहून त्यावर कमेंट करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. 

ज्या चाहत्यांना पलकला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे, त्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण पलकचा ‘रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विशाल मिश्राने दिग्दर्शित केला असून विवेक ओबेरॉय आणि प्रेरणा वी. अरोरा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. या चित्रपटात पलकसोबत विवेक ओबेरॉय दिसणार आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

पलक तिवारी ही श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पलक आपल्या आईसोबतच राहते. आपली आई श्वेता तिवारीप्रमाणेच पलकचेही अनेक चाहते आहेत आणि ते पलकला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. अलीकडेच खरं तर श्वेता तिवारी आणि तिचे दुसरे पती अभिनव कोहली यांच्यातील वाद विकोपास गेल्यामुळे पलकने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट रद्द केलं होतं.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

मागचे काही दिवस श्वेता आणि अभिनव यांच्यातील शाब्दिक मारामारी पाहायला मिळाली. ‘खतरों के खिलाड़ी 11’ या कार्यक्रमात सहभागी होण्यावरून त्यांच्यात वाद झाले होते. श्वेता त्यांच्या मुलाला हॉटेलमधे ठेवून केपटाऊनला निघून गेली, अशा समजाने अभिनवने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने पुढे असेही म्हटले आहे की, त्यांचा मुलगा तिच्या कुटुंबासोबत आहे. श्वेता आणि अभिनव यांच्यामधील याच वादावादीमुळे पलकने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट रद्द केलं होतं.