चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा...

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा (Shweta Tiwari Shares Jaw Dropping Bold Photos At 40; Flaunts Her Cleavage)

सुप्रसिद्ध टी.व्ही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नित्यनेमाने आपले फोटो तिथे टाकत असते, जे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होतात. आता तिने पुन्हा आपले बोल्ड फोटो टाकले आहेत.

श्वेता तिवारीने वयाची चाळीशी गाठली आहे. ती दोन मुलांची आई आहे. पण तिचे हे फोटो पाहून असे वाटते की, वय वाढत चालले तरी ती दिवसेंदिवस हॉट होते आहे. आता तिने १० किलो वजन घटविले आहे. त्यामुळे ती अधिकच ग्लॅमरस्‌ व सुंदर दिसते आहे.

आता तिने इन्स्टाग्रामवर जे फोटो प्रदर्शित केले आहेत, त्यामध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या दिसतात.

या फोटोंमध्ये श्वेताने ऑलिव्ह ग्रीन आणि गोल्डन प्रिंटवाला गाऊन घातला आहे. त्यातून तिच्या अंगप्रत्यंगाचे दर्शन घडत आहे. श्वेताच्या या हॉट फोटोज्‌नी जणू इंटरनेटवर आग लावली आहे.

न्यूड मेकअप आणि स्ट्रेट हेअर असा अवतार श्वेताने धारण केला आहे. या फोटोज्‌मध्ये तिचा लूक आकर्षक आहे नि अशा काही सेक्सी पोझेस्‌ दिल्या आहेत की, तिच्या फॅन्सनी भरपूर लाईक्स दिले आहेत.

हे फोटो शेअर करून श्वेता लिहिते – ‘मुझे ट्राय मत करना. मी जन्मतःच निर्भय आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चकीत केले आहे.’

काही दिवसांपूर्वी श्वेताने गुलाबीसर फ्लोरल ड्रेसमध्ये आपले काही छान छान फोटो टाकले होते. ते देखील चाहत्यांना आवडले होते.