श्वेता तिवारीचा सुपर स्टायलिश ग्रीन गाऊन (Shwet...

श्वेता तिवारीचा सुपर स्टायलिश ग्रीन गाऊन (Shweta Tiwari Shares Bold Photos In Hot Green Gown, Photos Went Viral)

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा अर्थात्‌ श्वेता तिवारीचा चेहरा आणि फिगर पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं अशक्य आहे. श्वेता तिवारीने सोशल मीडियावर सुपर स्टायलिश ग्रीन गाऊनमधील आपले फोटोज शेअर केले आहेत. श्वेताच्या या फोटोंनी चाहत्यांची हालत मार डाला… अशी केली आहे. तूझं असं हॉट दिसणं कधी थांबेल… अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

श्वेता तिवारीच्या या सौंदर्य आणि स्टाइल समोर तिची मुलगी पलकही फिकी पडेल. श्वेता नेहमीच आपले वेगवेगळ्या अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो पाहण्यासाठी चाहतेही तितकेच आसुसलेले असतात. ते तिच्या फोटोंना मनापासून कमेंट्‌स देतात. श्वेताच्या आताच्या सुपर स्टायलिश ग्रीन गाऊनमधील फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

या आधीही श्वेता तिवारीने सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तुम्हीही श्वेताचे हे बोल्ड फोटो पाहा.

या सगळ्या फोटोंमधील खास बाब अशी आहे की, काही दिवसांपासून श्वेता अधिकच कमनीय आणि सुंदर दिसू लागली आहे. तिच्या फिटनेसचं गुपित आहे तिचा वर्कआऊट आणि डाएट प्लान. तुमचा विश्वास बसणार नाही पण, श्वेताने अतिशय कष्टाने आपले १० किलो वजन कमी केले आहे. श्वेता अचानक इतकी फिट आणि सुंदर का दिसतेय हे जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या चाहत्यांसाठी, श्वेताने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत आपल्या फिटनेसचं रहस्य उलगडलं होतं.

या फोटोंमध्ये श्वेताने आपली नजाकत दाखवली आहे.

श्वेता तिवारीनं इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करताना लिहिलंय्‌, “Weight Loss! Phew… वजन घटविणं हे सोपं नाही… अतिशय अवघड काम आहे! यासाठी आपली इच्छाशक्ती, दृढता आणि स्वतःवर ताबा हवा. हां, पण तुमच्या जीवनात किनिता कडाकिया पटेल सारखी व्यक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मला पुन्हा आकारात आणण्यासाठी माझ्यापेक्षा अधिक ती ठाम होती. माझ्या प्रशिक्षकासोबत संवाद साधून सकाळपासून – संध्याकाळपर्यंत माझ्या प्रत्येक गरजेची, आवडीची आणि डाएटची तिनं काळजी घेतली. मी तिच्यासाठी क्लाएंट नाही तर एक मिशन आहे. आज मला या डॉक्टरांमुळेच ही सडसडीत आणि निरोगी शरीरयष्टी मिळाली आहे.” आपल्या या पोस्टमध्ये श्वेताने आपल्या फिटनेसचं सर्व श्रेय आपली डायटीशियन सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट किनिता कडाकिया पटेल यांना दिलं असून त्यांच्यामुळेच मी आज इतकी फिट आहे, असं म्हटलं आहे.

फिट आणि सडसडीत बांध्यासाठी श्वेता तिवारी आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा जिममध्ये जाते. ज्या दिवशी ती जिममध्ये जाऊ शकत नाही, त्या दिवशी ती घरी जवळजवळ १ तास ट्रेडमिल करते. जिममध्ये श्वेता आपल्या पोटाची डेरी कमी करण्यासाठी वेट लिफ्टिंग आणि कार्डिओ एक्सरसाइज करते.

जिममधील कसरती दरम्यान श्वेता फ्रेश फ्रूट ज्यूस पिते. आरोग्यासाठी एकही दिवस न चुकवता दररोज योगा करते. विकेंडला आपल्या मुलीसोबत श्वेता स्विमिंगसाठी जाते.