श्वेता तिवारीला पांढऱ्या क्रॉप टॉपमध्ये पाहून क...

श्वेता तिवारीला पांढऱ्या क्रॉप टॉपमध्ये पाहून करणवीर बोहरा उद्‌गारला, ‘हाय श्वेता, तू माझ्या आईला पाहिलेस का?(Shweta Tiwari Looks Smoking Hot In Latest Pictures, Karanvir Bohra Comments- ‘Hi Shweta, Have You Seen My Momma?’)

श्वेता तिवारीकडे अभिनय कौशल्य आणि सौंदर्य पुरेपूर भरलं आहे. वाढत्या वयाचा तिच्यावर काहीच परिणाम दिसत नसून, उलट ती जास्तच सुंदर दिसते आहे. तिचं प्रत्येक फोटोशूट पाहून चाहत्यांच्या भावना उचंबळून येतात. वय वाढलं की, रुप कमी होतं, असं म्हणतात. पण श्वेताची गोष्टच वेगळी आहे. तिचं वय कमी होतंय्‌ नि रुप वाढतंय्‌, अशा भावना तिच्याबद्दल चाहते व्यक्त करतात.

अलिकडेच श्वेताने जे फोटो शूट सादर केलं आहे, ते पाहून चाहत्यांची शुद्ध पुनः एकवार हरपली आहे. तिनं अंगाला घट्ट बसणारा पांढरा क्रॉप टॉप आणि हाय वेस्ट जिन्स घालून आपले फोटो प्रसिद्ध केले आहेत. तिनं केस मोकळे सोडलेत अन्‌ अशा मादक पोझेस दिल्यात की, चाहते उत्तेजित झालेत. कमेंट्‌स देऊ लागले आहेत.

बव्हंशी लोक बोलतात की, ही पलकची आई वाटते तरी का? श्वेताला २४ वर्षांची तरुण मुलगी आहे, यावर विश्वास बसत नाही. कित्येक लोक तिच्या रुपाची पलकशी तुलना करतात. अन्‌ पुढे जाऊन असंही म्हणतात की, समजा आई आणि मुलगी यांच्यापैकी कोणाशी डेट करण्याची संधी मिळाली तर आम्ही बाबा, आईलाच निवडू. कारण ही तर मुलीपेक्षा जास्त यौवनसंपन्न आणि सुंदर दिसते.

या फोटोंवर करणवीर बोहराने कमेंटस्‌ दिल्या आहेत. म्हणतो, ‘हाय श्वेता, तू माझ्या आईला पाहिलंस का?’

यातली गोम अशी आहे की, ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत श्वेताने करणवीरच्या आईची भूमिका केली होती. तेव्हापासून तो तिला ‘मॉम’ म्हणतो. दोघे चांगले दोस्त आहेत.

जगातील सुंदर स्त्री, असं श्वेताच्या चाहत्यांचं मत बनलं आहे. तिच्या फिट आणि सेक्सी शरीरयष्टीची ते तारीफ करत आहेत.

‘अपराजिता’ या मालिकेत श्वेता सध्या काम करते आहे. ती एकल मातेची भूमिका आहे. आपल्या मुलीचं संगोपन करणाऱ्या एकल मातेची ती भूमिका आहे.