श्वेता तिवारीचे लेटेस्ट ट्रॅडिशनल लूक पाहून चाह...

श्वेता तिवारीचे लेटेस्ट ट्रॅडिशनल लूक पाहून चाहते वेडावले (Shweta Tiwari Looks Mesmerising In The Latest Traditional Avatar)

श्वेता तिवारी कमालीची सुंदर  पण तिने आपले वजन कमी करून शरीर प्रमाणबद्ध केले तेव्हापासून तिचे सौंदर्य अधिकच खुलू लागले आहे. अलीकडेच तिने  ट्रॅडिशनल लूकमधले आपले काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये ती रूपमती दिसते आहे.
चाहते तिच्या दिसण्यावर फिदा आहेत. ती दोन मुलांची आई आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. काही चाहते तर असंही  म्हणतात – असं काय गुपित आहे की, अनिल कपूर आणि श्वेता तिवारी पाहिल्यासारखेच दिसतात. वाढत्या वयाचा काही असर त्यांच्यावर दिसून येत नाही.
तेव्हा श्वेताचे हे छान छान  फोटो तुम्हीही नजरेखालून घाला. तिचे हे फोटो पाहून चाहते पुरते वेडावले आहेत.