तब्येत बिघडली म्हणून श्वेता तिवारी हॉस्पिटलात द...
तब्येत बिघडली म्हणून श्वेता तिवारी हॉस्पिटलात दाखल; माजी नवऱ्याने मात्र चेष्टेवारी नेत घेतली दखल (Shweta Tiwari Hospitalised On health Issue : Ex Husband Abhinav Kohli Writes A Cryptic Post)


टी.व्ही.ची लोकप्रिय आणि ग्लॅमरस् अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी जीवनाबद्दल चर्चेत असते. त्यानुसार आत्ताच खबर मिळाली आहे की, तिची तब्येत अचानक बिघडली. म्हणून तिला हॉस्पिटलात दाखल करावं लागलं आहे.

‘खतरों के खिलाडी ११’ या कार्यक्रमात श्वेता हल्लीच दिसली होती. अन् लवकरच ‘बिग बॉस १५’ मध्ये पण ती अवतरणार आहे. त्यासाठी ती रात्रंदिवस काम करत होती. अति श्रमाने तिची तब्येत अचानक बिघडली.

श्वेताने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही बातमी टाकली. तेव्हापासून तिचे चाहते बेचैन झाले आहेत.

श्वेता तिवारीच्या टीमने एक अधिकृत निवेदन या संदर्भात प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असल्याचे म्हटले आहे. लो ब्लडप्रेशर आणि अशक्तपणा आल्याने तिला हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. तिला अती कामाची दगदग झाली आहे. प्रवास खूप करावा लागला. त्यामुळे बदलते हवामान आणि दगदग झाल्याने तिची तब्येत बिघडली. आता ती फक्त आराम करते आहे. अन् लवकरच घरी परतेल, असं निवेदनात म्हटलं आहे.

ही बातमी कळताच श्वेताचे मित्र, आप्तेष्ट आणि चाहते, ती बरी होण्यासाठी सदिच्छा देत आहेत. पण तिचा माजी नवरा अभिनव कोहली याने तिच्या वजन घटविण्याच्या कृतीची चेष्टी केली आहे. ती लवकर बरी व्हावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली असली तरी वजन घटविण्याबाबत तिची मस्करी केली आहे.

अभिनव शुक्लाने या संदर्भात जी पोस्ट जारी केली आहे, त्याबद्दल श्वेताचे चाहते त्याला खडे बोल सुनवत आहेत.

वजन घटविणे आणि शरीर रचनेत बदल करण्याबाबत श्वेता खूपच चर्चेत आली होती. सोशल मीडियावर तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस अवताराने उसळी घेतली होती.