दोन वेळा बोहल्यावर चढलेल्या श्वेता तिवारीचा मुल...

दोन वेळा बोहल्यावर चढलेल्या श्वेता तिवारीचा मुलगी पलकला लग्न न करण्याचा सल्ला; म्हणते, माझा लग्नसंस्थेवरील विश्वास उठला आहे… (Shweta Tiwari Advices Daughter Palak Tiwari Not To Get Married, Actress Says- ‘I Don’t Believe In The Institution Of Marriage’)

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही तिच्या प्रोफेशनल जीवनात जितकी यशस्वी ठरली तितकीच तिच्या खाजगी जीवनात मात्र अपयशी ठरली आहे. कसौटीमधील प्रेरणाने सगळ्यांचे मन जिंकले, त्यानंतर श्वेता बिग बॉसची (Bigg boss winner) विजेती झाली. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये बरेच यश मिळविले परंतु प्रेम आणि लग्नाच्या (marriage) बाबतीत मात्र तिची फसवणूक झाली.

दोन्ही लग्नं फसल्यानंतर श्वेताचा आता लग्नसंस्थेवरील विश्वास उठला आहे. एवढेच नाही तर सध्या ती आपली मुलगी पलकला लग्न न करण्याचा सल्ला देत आहे. फक्त १८ वर्षांची असताना श्वेताचे राधा चौधरी यांच्यासोबत लग्न झाले होते. १९९९ मध्ये राजा आणि श्वेताचे लग्न झाले होते आणि त्यांना पलक झाली. पुढे २००७ साली तिने राजाला घटस्फोट दिला. त्यानंतर २०१३ मध्ये अभिनव कोहली सोबत तिने सात फेरे घेतले, त्यांना रियांश हा मुलगा झाला अन्‌ २०१९मध्ये त्यांचे लग्न मोडले.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्वेताने म्हटले की, तिचा लग्नासारख्या प्रथेवरून विश्वास उठला आहे आणि मी माझ्या पलकला लग्न न करण्याचा सल्ला देते. खरं तर ती तिच्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, पण मला असं वाटतं की तिने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा. आपण एका नात्यात आहोत आणि त्या नात्याला नाव देणं गरजेचं आहे, म्हणून तिने लग्नाचा निर्णय घेऊ नये. तिने कोणत्याही दबावाखाली येऊन लग्न करू नये, असे मला वाटते. तिने तिचे आयुष्य तिला हवे तसे जगावे, परंतु लग्नाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

श्वेता असेही म्हणते की, सर्वच विवाह मोडत नाहीत, परंतु तिने तिच्या बऱ्याच मित्रांना लग्नात तडजोड करताना पाहिले आहे. मुलांकडे पाहून काहीजण मनाविरुद्ध लग्न निभावत राहतात. श्वेताच्या कामाबद्दल सांगायचे तर लवकरच ती एका नव्या ‘मैं हूं अपराजिता’ या शो मधून टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे, ज्यामध्ये ती एका अशा महिलेची भूमिका करत आहे, की जी आपल्या तीन मुलींना एकटीच सांभाळताना दिसणार आहे. तर पलकच्या बाबत सांगायचं म्हणजे ती सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे.