श्वेता बच्चनने केला आपल्या आईवडिलांबाबत धक्कादा...

श्वेता बच्चनने केला आपल्या आईवडिलांबाबत धक्कादायक खुलासा (Shweta Bachchan Made Many Shocking Revelations About Her Parents, You Will Also be Surprised to Know)

श्वेता बच्चनही अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची लाडकी मुलगी आहे. श्वेता ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. नुकताच श्वेता बच्चनने आपल्या आईवडीलांबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

श्वेता बच्चनची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ‘व्हॉट द हेल नव्या’ नावाचे पॉडकास्ट करते. नव्याची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन या पॉडकास्टच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या, तेव्हा श्वेता बच्चनने आपल्या बालपणाशी संबंधित अनेक आठवणी सांगत पालकांबद्दलही अनेक खुलासे केले.

पॉडकास्टमध्ये श्वेता बच्चनने सांगितले की, लहानपणी माझी आई जया बच्चन कधीही मला कानाखाली मारायची. श्वेताने सांगितले की, मी अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागाची व्हावी यासाठी माझी आई विशेष काळजी घेत असे. मला भरतनाट्यम, हिंदी शास्त्रीय संगीत, पोहणे, सितार आणि पियानो वाजवायला शिकायचे होते. जया बच्चन यांनी सुद्धा मला शिकवण्यात कोणतीही कसर मागे सोडली नाही.

श्वेताने सांगितले की, जर या सर्व गोष्टी शिकण्यात थोडीशी चूक झाली तर आई मला कानाखाली मारायची. लहानपणी मी आईचा खूप मार खाल्ला होता. एकदा तर आईने मला खूप बेदम चोपले होते.

यावर जया बच्चन म्हणाल्या की, श्वेता लहानपणी खूप हट्टी आणि चिडखोर होती. लहानपणी प्रत्येकजण मार खातात. मी सुद्धा लहान असताना मार खाल्ला होता. जया पुढे म्हणाल्या की, पालक आपल्या मुलांना तेव्हाच मारतात जेव्हा ते स्वतःवर रागावतात.

या पॉडकास्टमध्ये श्वेताने वडील अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख करत सांगितले की, लहानपणी तेही मला शिक्षा करायचे. त्यांना कधी राग आला की ते मला  कोपऱ्यात उभं राहायला सांगायचे. पण मला मात्र वडिलांची ही शिक्षा आवडायची कारण मी कोपऱ्यात उभी राहून गोष्टी तयार करुन स्वतःशीच बोलायची.