सारा अली खानसोबतच्या नात्याबद्दल शुभमन गिलने सो...

सारा अली खानसोबतच्या नात्याबद्दल शुभमन गिलने सोडले मौन (Shubman Gill Reacts To His Dating Rumours With Sara Ali Khan On Punjabi Chat Show ‘Dil Diyan Gallan’, Says, ‘Sara Da Sara Sach Bol Diya’)

मध्यंतरी क्रिकेटर शुममन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यांनी सोशल मीडियावरुन एकमेकांना अनफॉलो केल्यावर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर आता सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या. त्यांनी याबाबत अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांना अनेकदा एकत्र फिरतानाही पाहिले गेले आहे.त्यामुळे या दोघांचे चाहते त्यांच्या नात्याबद्दल संभ्रमात आहेत. पण शुभमन याने या चर्चांवरचे मौन सोडून एक वेगळाच खुलासा केला आहे.

‘दिल दिया गल्ला’या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने हजेरी लावली होती. तेव्हा त्याला बॉलिवू़ड इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने लगेच अभिनेत्री सारा अली खानचे नाव घेतले. शुभमनचे हे उत्तर ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे लगेचच सूत्रसंचालकाने विषयाला हात घालत थेट त्याला त्याच्या व साराच्या डेटिंगबद्दल प्रश्न विचारला.

यावर शुभमन याने कदाचित असे उत्तर दिले. यावर पुन्हा सूत्रसंचालकाने साराचे सर्व सत्य सांग असे म्हटले, त्यावर त्याने लाजत कदाचित हो, कदाचित नाही असे उत्तर दिले.

शुभमन याने स्पष्ट होकारही दिलेला नाही किंवा नकारही दिलेला नाही. तसेच त्याच्या लाजत उत्तर देण्यावरुन तरी त्याच्यात आणि सारामध्ये काहीतरी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.