श्रुति हसनची आई आणि अभिनेत्री सारिकाचा धक्कादाय...

श्रुति हसनची आई आणि अभिनेत्री सारिकाचा धक्कादायक खुलासा, लॉकडाऊनमध्ये २००० रुपयांत चालवावं लागलं घर (Shruti Haasan’s mom Sarika opens up about running out of money during lockdown : ‘You just get 2000 in theatre…’)

कोरोनामुळे सामान्य माणूसच नव्हे तर काही खास व्यक्तींनाही अनेक समस्यांतून जावं लागलं आहे. यात बॉलिवूडमधील सेलिब्रेटींचाही समावेश आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक बी-टाउन सेलेब्स देखील आर्थिक संकटातून गेले आहेत आणि त्यांनी याबद्दल खुलेपणाने बोलले आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री अन्‌ कमल हसनची माजी पत्नी आणि श्रुती हसनची आई सारिका यांनीही त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटाबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. लॉकडाऊन दरम्यान तिला आर्थिक समस्यांचा सामना कसा करावा लागला आणि ही परिस्थिती तिने कशी हाताळली हे तिने सांगितले आहे.

सारिकाने नुकताच लॉकडाऊन दरम्यानचा तिचा वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान त्यांच्याकडे पैसे संपले होते आणि त्यांना गरिबीत दिवस काढावे लागले. सारिकाच्या या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सारिकाने नुकताच एका मुलाखती दरम्यान असे सांगितले होते की, ‘लॉकडाऊन दरम्यान माझ्याकडे असलेले सर्व पैसे संपले, मग काय करणार? कुठे जाणार? त्यामुळे मला पुन्हा अभिनयाला सुरुवात करावी लागली. मी थिएटर करू लागले. थिएटरमध्ये फक्त २०००-२७०० रुपये दिले जायचे, पण दुसरा पर्यायच नव्हता. फक्त एक वर्षच मी नाटक करण्याचा निर्णय घेतला होता, पण बघता बघता पाच वर्ष उलटून गेली. आणि ही पाच वर्षे खूप चांगली गेली.

सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सारिकाचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे आणि सर्व खूप यशस्वी आहेत. सारिकाचा माजी पती कमल हासनला केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही खूप मागणी आहे, तर तिच्या मुली श्रुती हसन आणि अक्षरा हसन याही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

सारिकाची गणनाही चांगल्या अभिनेत्रींमध्ये केली जाते, पण २०१६ मध्ये कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘बार बार देखो’ नंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला आणि थिएटर करायला सुरुवात केली. यादरम्यान लॉकडाऊन लागला आणि तिला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले. पण सारिका म्हणते की, ‘हा माझा निर्णय आहे. मी एक वर्षाचा ब्रेक घेणार आहे आणि कोणतेही काम करणार नाही. मी दूर कुठेतरी जाईन आणि काहीतरी वेगळे करेन. म्हणूनच मी थिएटर केले आणि मला थिएटर करताना खूप आनंद होतो.”

तथापि, पाच वर्षांच्या ब्रेकनंतर प्रितिश नंदी कम्युनिकेशन्सच्या ‘मॉडर्न लव्ह: मुंबई’ सोबत सारिका पुनरागमन करत आहे, ज्याचा प्रीमियर आज म्हणजेच १३ मे रोजी होणार आहे. याशिवाय तिच्याकडे सूरज बडजात्याचा ‘हाइट’ हा चित्रपट आहे, ज्यात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय ती ‘अँथॉलॉजी’ या वेबसीरिजमध्येही दिसणार आहे.