श्रेयस तळपदेने सांगितली एका शर्टाची गोष्ट…...

श्रेयस तळपदेने सांगितली एका शर्टाची गोष्ट…. (Shreyas Talpade Narrates A Coincidence Of A Shirt In His Career)

 मराठी सिनेसृष्टीला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या मातब्बर कलाकारांनी दाखवले. या कलाकारांमुळे मराठी चित्रपटांसमोर हाऊसफुलच्या पाट्या झळकू लागल्या. या कलाकारांनी तो काळ गाजवलाच पण या काळात देखील त्यांचे चित्रपट अगदी आवडीने पाहिले जातात. पुढे या कलाकारांनी अभिनयाशिवाय निर्मिता आणि दिग्दर्शक या भूमिकाही उत्तम पार पाडल्या.

महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आजही हाऊसफुल होतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या चित्रपटांची नावे ५ अक्षरी ठेवतात. धुमधडाका या चित्रपटातून त्यांनी 1985 मध्ये दिग्दर्शनाला सुरुवात केली. हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. काळ बदलत गेला तसे कलाकारही बदलत गेले पण महेश कोठारे यांनी काही गोष्टी खूप मनापासून जपल्या. याचेच उदाहरण अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिले आहे.

Pachadlela Marathi Full Movie Facts | Bharat Jadhav | Shreyas Talpade |  Laxmikant Berde - YouTube

श्रेयसने महेश कोठारेंच्या 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या पछाडलेला या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातली एक सुंदर आठवण श्रेयसने शेअर केली आहे.

धुमधडाका चित्रपटात अशोक सराफ यांनी एका सीनमध्ये आपल्या प्रेयसीला भेटायला जाताना काळ्या रेघा असलेला पांढरा शर्ट घातलेला पाहायला मिळतो. आणि तोच शर्ट इतक्या वर्षांनी पछाडलेला चित्रपटातही वापरण्यात आला होता.या चित्रपटात श्रेयस तळपदेने तोच शर्ट पुन्हा घातला होता. म्हणजे 19 वर्षांनंतरही महेश कोठारे यांनी चित्रपटाची प्रॉपर्टी नीट जपून ठेवली होती. त्याबद्दल श्रेयस म्हणाला की, “महेश सर फक्त वस्तूच नाही तर नाती सुद्धा तितक्याच प्रेमाने जपतात” चित्रपटात संधी दिल्याबद्दल महेश कोठारे यांचे मनापासून धन्यवाद मानतो.

Dhum Dhadaka Movie Review | Dhum Dhadaka Movie Cast | Dhum Dhadaka | Indian  Film History