बॉलिवूडच्या ढोंगबाजीचा श्रेयस तळपदेने केला पर्द...

बॉलिवूडच्या ढोंगबाजीचा श्रेयस तळपदेने केला पर्दाफाश; म्हणाला – मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसला… (Shreyas Talpade Finally Spelled Out Bollywood’s Hypocrisy: Said Friends backstabber him)

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर बराच काळ बॉलिवूडमधील गटबाजी आणि वशिलेबाजी हे विषय चघळले गेले. बॉलिवूडमध्ये आपल्याशी झालेल्या भेदभावाबाबत कित्येक कलाकारांनी तोंड उघडले आणि बॉलिवूडमध्ये गटबाजी व घराणेशाही असल्याचे कबूल केले. आणि आता चांगला अभिनेता असलेल्या श्रेयस तळपदेने याच विषयावर तोंड उघडले.

‘गोलमाल’, ‘हाऊस फुल’ अशा यशस्वी चित्रपटांमध्ये श्रेयस तळपदेने झकास भूमिका केल्या. आपल्यासारख्या चांगल्या नटाला जे स्थान मिळायला पाहिजे होतं, ते बॉलिवूडमध्ये मिळालं नाही, याची त्याला नेहमीच खंत वाटत राहिली आहे. या क्षेत्रात चालू असलेला भेदभाव आणि गटबाजी हेच या गोष्टीला जबाबदार आहेत, पर्दाफाश श्रेयसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतून केला.

नेहमीच रिजेक्शन सोसावं लागलं

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेने बॉलिवूडमधील ढोंगबाजी व गटबाजीबद्दल पहिल्यांदाच तोंडसुख घेतलं. आपल्याला नेहमीच रिजेक्शन सोसावं लागलं, असं त्यानं सांगितलं. ‘इकबाल’ या चांगल्या चित्रपटानंतर, मला आपलं टॅलन्ट दाखविणारी भूमिका मिळावी, अशी मी वाट पाहत राहिलो. पण दुर्दैवाने मला अद्याप तशी संधी मिळालेली नाही. ‘गोलमाल’ आणि ‘हाऊस फुल’ सारख्या मल्टी स्टारर चित्रपटापर्यंतच माझी मजल गेली.

या क्षेत्रात टॅलन्टचा मापदंड नाही

क्रिकेट क्षेत्रात एक मापदंड आहे. तुम्ही जास्त धावा केल्या तर तुम्ही चांगले फलंदाज, असं मानलं जातं. पण फिल्म इंडस्ट्रीत असा कोणताच मापदंड नाही. कदाचित म्हणूनच मी मागे पडलो.

इथे हिपोक्रसी आहे, भेदभाव आहे

माझे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत, हे मला मान्य आहे. पण कित्येक बड्या स्टार्सना पण हे अपयश बघावं लागलं आहे. म्हणून काही त्यांना बडे बॅनर आणि बडे चित्रपट मिळणं थांबत तर नाही ना! पण माझ्या बाबतीत हे घडलं. का, ते मला अद्याप समजलेलं नाही. माझा एक चित्रपट चालला नाही तर, लोक मला येऊन सांगतात – बाबा रे, तुझा चित्रपट पडला. आता पुढल्या चित्रपटात तुझी प्राईस कमी होईल. पण इथे असे कितीतरी नट आहेत, जे एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट देतात. पण त्यांची मार्केट प्राईस कमी होत नाही किंवा बडे बॅनरवाले त्यांना दूर ठेवत नाहीत. अशी हिपोक्रसी, असा भेदभाव मनाला दुखावतो. याचाच अर्थ इथे टॅलन्टला काही किंमत नाही, अन्य कोणत्या तरी गोष्टीला आहे. इथे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम आहेत. अन्‌ मला हेच आवडत नाही.

मला मार्केटिंग करता आले नाही

मला आपले मार्केटिंग करता आले नाही, असेही श्रेयस बोलला. ”माझं काम, माझं टॅलन्ट कामी येईल, असं मला वाटलं होतं. पण तसं घडलं नाही.”

काही मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसला

इथे काही ॲक्टर्स असेही आहेत की, जे माझ्यासोबत पडद्यावर येऊ इच्छित नव्हते. ते आपल्या चित्रपटात मला घेणारच नव्हते; याही गोष्टी मला कळल्या. तरी पण मी काही चित्रपट दोस्तीखातर केले. पण नंतर मला समजलं की या मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. माझ्या या मित्रांनी मला न घेता चित्रपट तयार केले. अशा लोकांना मित्र कसे म्हणायचे? खरं सांगायचं तर या इंडस्ट्रीत ९० टक्के लोक असेच आहेत. तुमची प्रगती पाहून खुश होणारे फक्त १० टक्के लोक असतील.

ओटीटी प्लॅटफॉर्मने टॅलन्ट ओळखलं

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचा भेदभाव नाही, असं श्रेयस सांगतो. तुम्ही एखाद्या फिल्मी घराण्यातून आला आहात की नाही, ते इथं पाहिलं जात नाही. फक्त टॅलन्ट जोखलं जातं. म्हणूनच आज प्रतीक गांधी (स्कॅम १९९२) आणि जयदीप अहलावत (पाताल लोक) हे बडे स्टार गणले जातात. मनोज बाजपेयी आणि के. के. मेनन यांचं टॅलन्ट अखेरीस लोकांपर्यंत पोहचू तरी शकतं