श्रेयस तळपदे आणि क्रिती सेनॉनमध्ये एका ट्विटमुळ...
श्रेयस तळपदे आणि क्रिती सेनॉनमध्ये एका ट्विटमुळे झाला गैरसमज, अभिनेत्याने मागितली माफी (Shreyas Talpade and Kriti Sanon had a misunderstanding over a tweet, the actor apologized to her)

सोशल मीडियावर चाहत्यांकडून फॅन पेज चालवणं, फेक अकाउंट ओपन करणं या गोष्टी अगदी सर्रास चालतात. अशाच एका फेक अकाउंटमुळे मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला श्रेयस तळपदे गोत्यात आला आहे. शिवाय त्यामुळे त्याला अभिनेत्री क्रिती सेनॉनची माफीही मागावी लागली आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेची फॅनफॉलोविंग जबरदस्त आहे. तो अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी किंवा सहकलाकारांसाठी ट्विट करत असतो. श्रेयसचे एक ट्विटसध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यात त्याने अभिनेत्री क्रिती सेनॉनची माफी मागितली आहे.
अभिनेत्याने क्रितीची माफी का मागितली असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेलच.. याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो.

श्रेयसच्या अकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या ट्विटमध्ये क्रितीला टॅगही करण्यात आले होते. त्यात लिहिलेलं की, मी नुकतंच शेहजादा पाहिला.. क्रिती तूच देशाची पुढची मधुबाला आहेस’.

क्रितीनेही खुश होत या ट्विटला उत्तर दिले. ही खूप मोठी गोष्ट असून, तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद म्हटलं होत.

पण गंमत तर पुढे आहे. ती म्हणजे क्रितीला टॅग करुन केलेले ते ट्विट श्रेयसने केलेच नव्हते. त्याच्या फेक अकाउंटवरुन कोणीतरी हा ट्विट केला होता. आणि क्रितीनेसुद्धा अकाउंट अधिकृत आहे की नाही तपासून न पाहता त्यावर उत्तर दिलं होतं.त्यामुळेच श्रेयसने ट्विट करत, क्रितीची माफी मागत, तिला तिच्या सिनेमासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.