या देशात साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल दिन’ (Sh...
या देशात साजरा केला जातो ‘श्रेया घोषाल दिन’ (Shreya Ghoshal Birthday : Shreya Ghoshal Birthday Shreya Ghoshal Day Is Celebrated On 26 June In Every Year In Ohio)

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे श्रेया घोषाल. आज १२ मार्च रोजी श्रेयाचा वाढदिवस आहे. तिचा जन्म दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात झाला. श्रेयानं पार्श्वगायिका म्हणून चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार, सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. अशा या गुणी गायिकेचा आज ३९ वा वाढदिवस आहे.

श्रेयाने ‘सारेगमप’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. तिने हा शो जिंकला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. तिने आजवर मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी आणि काही भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

श्रेयाला केवळ भारतातच नाही तर परदेशातील अनेक मानसन्मान मिळाले. अमेरिकेतील ओहायो राज्यात गव्हर्नर टेड स्ट्रिकलँड यांन २६ जून हा दिवस श्रेया घोषाल दिवस म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दरवर्षी ओहियो राज्यात श्रेया घोषाल दिवस साजरा केला जातो. श्रेयाला मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. याशिवाय श्रेयाला २०१३ मध्ये युकेमधील हाऊस ऑफ कॉमन्सनं निवडलेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात श्रेयाचाही समावेश होता.

श्रेयाने ‘देवदास’ चित्रपटातील ‘सिलसिला’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील ‘बैरी पिया’ या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेयाने २०१५ साली तिचा बॉयफ्रेण्ड शिलादित्य सोबत विवाहगाठ बांधली. २०२१ साली तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर श्रेयाचं ‘बारिश आयी है’ हे गाणं प्रदर्शित होणार आहे, यात करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत आहेत.