संगीतकार श्रवणला कुंभमेळा बाधला (Shravan Was Af...

संगीतकार श्रवणला कुंभमेळा बाधला (Shravan Was Affected With Covid -19 In Kumbhamela)

लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यातील एक संगीतकार श्रवणकुमार राठोड यांचे कोविड-१९ च्या संसर्गाने दुःखद निधन झाले. हा संसर्ग त्यांना कुंभमेळ्यास गेल्यानंतर झाला. अशी माहिती त्यांचा मुलगा संजीव राठोड याने उघड केली आहे. श्रवण आपल्या पत्नीसह काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यात गेले होते. तेथून आल्यावर श्रवण यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांची चाचणी केल्यावर त्यांना सदर रोगाची बाधा झाल्याचे उघडकीस आले.

कुंभमेळ्यात भयंकर गर्दी असते, तिथे जाऊ नकोस; असा सल्ला श्रवणच्या मित्रांनी त्यांना दिली होता. पण मित्रांचा सल्ला मनावर न घेता श्रवण तिथे गेले आणि करोनाचा संसर्ग ओढवून घेतला.

दुर्दैवाची गोष्ट अशी की, श्रवण यांचा संसर्ग त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही झाला असून ते दोघे रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्रवण यांचा भाऊ दर्शन यालाही करोनाची बाधा झाली असून तो घरातच विलगीकरण करून उपचार घेत आहे.