निसर्गरम्य मालदीवमध्ये श्रद्धा कपूरचा फलाहार (S...

निसर्गरम्य मालदीवमध्ये श्रद्धा कपूरचा फलाहार (Shradha Kapoor In Maldives; Enjoys Breakfast With A Serene View)

‘चालबाज इन लंदन’ या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा कपूर चर्चेत राहिली आहे. आता ती सुट्टी घालवण्यासाठी मालदीव बेटांवर गेली आहे. तेथून पाठवलेली छायाचित्रे चाहत्यांचं मन रिझवीत आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

श्रद्धा कपूरच्या या लूकवर चाहत्यांनी भरपूर कमेन्टस्‌ दिल्या आहेत. काही तिच्या लांब केसांवर फिदा झाले आहेत, तर काहींनी तिच्या ड्रेसवर कमेन्टस्‌ केल्या आहेत. मालदीवच्या काही खास डिशेस्‌ श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्या आहेत. मालदीवच्या फळांनी भरलेल्या एका डिशचा फोटो शेअर केला आहे. शिवाय त्या फळांची नावे टाकून त्यांची माहिती दिली आहे. याचा अर्थ श्रद्धा मालदीवमध्ये फलाहार करते आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

आपल्या बऱ्याच सिताऱ्यांचे मालदीव हे हवापालटाचे उत्तम ठिकाण झाले आहे. तेथील निसर्गरम्य वातावरणात मन रमते. मनावरील दडपण कमी होतं. त्यानुसार श्रद्धा कपूर आपले क्षण शांततेमध्ये घालवते आहे. तिच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर ‘चालबाज इन लंदन’ या आगामी चित्रपटात ती डबल रोलमध्ये दिसणार आहे. शिवाय निखिल द्विवेदी यांच्या ‘नागिन’ मध्ये ती इच्छाधारी नागिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.