लग्नाच्या वावड्या उठत असतानाच श्रद्धा कपूरचे, द...

लग्नाच्या वावड्या उठत असतानाच श्रद्धा कपूरचे, दुल्हनच्या लाल वेषातले फोटो पाहून चाहते झाले चकीत! (Shraddha Kapoor’s Bridal Look Going Viral Amidst Her Marriage News, Actress Looks Royal In Red Lahenga)

मागील बऱ्याच दिवसांपासून फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ याच्यासोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर सतत चर्चेत असते. खरं तर दोघांनी अजूनही त्यांच्यातील नातं उघडपणे सांगितलेलं नाही. परंतु त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठत आहेत शिवाय दोघं लवकरच सात फेरे घेणार असल्याचंही बोललं जात आहे.

Shraddha Kapoor's Bridal Look

श्रद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या बातमीत कितपत सत्य आहे, ते माहीत नाही. परंतु दरम्यान या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा दुल्हनच्या लाल वेषात अतिशय सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor's Bridal Look
Shraddha Kapoor's Bridal Look
Shraddha Kapoor's Bridal Look

सतत सोशल मीडियावर सक्रीय राहून श्रद्धा तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने आपले दुल्हनच्या वेषातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात तिने भरजरी लाल रंगाचा दुल्हनचा लेहंगा घातला आहे. दुल्हनच्या वेषातील श्रद्धाचं रुप अप्सरेप्रमाणे दिसत असून चाहते तिच्या रुपामध्ये हरखून गेले आहेत.

Shraddha Kapoor's Bridal Look
Shraddha Kapoor's Bridal Look

सुप्रसिद्ध डिझायनर फाल्गुनी शेन पीकॉकच्या ब्रायडल कलेक्शनसाठी श्रद्धाने हे फोटोशूट करून घेतले आहे. लाल रंगाचा जड ब्रायडल लेहंगा, त्यावर साजेसे दागिने आणि अतिशय साधा मेकअप अशा श्रद्धाच्या सोज्वळ रुपाला चाहते भाळले आहेत. श्रद्धाच्या लग्नाच्या वावड्या उठत असतानाच योगायोगाने तिचे अशाप्रकारचे दुल्हन वेषातील फोटो प्रसारित झाल्याने चाहते चकीत झाले आहेत. परंतु तिचा हा ब्रायडल लूक सगळ्यांच्याच खूप पसंतीस येत आहे.

Shraddha Kapoor's Bridal Look
Shraddha Kapoor's Bridal Look

खरं म्हणजे, २३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या ‘इंडिया क्यूटोर वीक २०२१’ या फॅशन वीकमध्ये डिझायनर फाल्गुनी पीकॉकने आपले हे ब्रायडल कलेक्शन प्रसारित केले आहे आणि श्रद्धाने तिचे हे कलेक्शन केवळ प्रदर्शित केले आहे.

Shraddha Kapoor's Bridal Look