या उत्तमोत्तम चित्रपटांची ऑफर श्रद्धा कपूरने ना...

या उत्तमोत्तम चित्रपटांची ऑफर श्रद्धा कपूरने नाकारली (Shraddha Kapoor Has Rejected The Offer Of These Best Films)

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, लोकांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. श्रद्धाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून केली असली, तरी ‘आशिकी 2’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांचे मन जिंकले. यानंतर ‘एक व्हिलन’ ते ‘हसीना पारकर’, ‘छिचोरी’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘स्त्री’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

श्रद्धा कपूरची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच चित्रपट निर्माते श्रद्धा कपूरला त्यांच्या चित्रपटात घेऊ पाहतात. पण बऱ्याचदा अभिनेता किंवा अभिनेत्री वेळेअभावी किंवा स्क्रिप्ट नापसंतीमुळे ऑफर नाकारतात. अन्‌ श्रध्दासोबत एकदा नाही तर अनेकदा असे घडले आहे. अनेकवेळा तिने या ना त्या कारणाने सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल ज्यांची ऑफर आधी श्रद्धा कपूरला होती, पण तिने ती नाकारली होती.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

आरआरआर या चित्रपटाचे प्रसिद्ध निर्माते एसएस राजामौली यांच्या चित्रपटांचा भाग होण्याचे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. मात्र जेव्हा श्रद्धा कपूरला ‘आरआरआर’ चित्रपटात काम करण्याची ऑफर आली तेव्हा तिने ही ऑफर नाकारली. श्रद्धाला चित्रपटात ज्युनियर एनटीआरच्या विरुद्ध पात्राची ऑफर देण्यात आली होती. परंतु वेळेच्या कमतरतेमुळे श्रद्धाला इच्छा नसतानाही या चित्रपटात काम करण्यास नकार द्यावा लागला.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

लकी – एका शाळेत श्रद्धा कपूरचा अभिनय पाहून सलमान खान तिच्या अभिनयाने खूप प्रभावित झाला होता. अशा परिस्थितीत श्रद्धाने ‘लकी’ चित्रपटातून करिअरची सुरुवात करावी, अशी सलमानची इच्छा होती. मात्र त्यावेळी श्रद्धाला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. याच कारणामुळे तिने सलमान खानची ऑफर नाकारली. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती परदेशात गेली.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

सायना – सायना नेहवालच्या बायोपिक चित्रपटाची ऑफरही परिणीती चोप्राच्या आधी श्रद्धा कपूरला मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमूल गुप्ते यांनी या चित्रपटासाठी श्रद्धालाही साइन केले होते आणि तिनेही या चित्रपटाची तयारी सुरू केली होती. पण अचानक श्रद्धा या चित्रपटातून का बाहेर पडली हे कळलं नाही. त्यानंतर परिणीती चोप्राला या चित्रपटासाठी साईन करण्यात आले.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

लव रंजनचा चित्रपट ‘रामायण’ – मिळालेल्या माहितीनुसार, लव रंजनला त्याच्या ‘रामायण’ चित्रपटात श्रद्धा कपूरला कास्ट करायचे होते. पण तिच्या व्यस्त शेड्युलमुळे श्रद्धा कपूरने या चित्रपटाची ऑफरही नाकारली असे समजले. मात्र, श्रध्दा कपूरने या वृत्ताचे खंडन केले असून मला या चित्रपटाची ऑफर कधीच मिळाली नसल्याचे सांगितले.