श्रद्धा कपूरने नाकारले होते हे सर्वोत्कृष्ट चित...

श्रद्धा कपूरने नाकारले होते हे सर्वोत्कृष्ट चित्रपट (Shraddha Kapoor Has Rejected The Offer Of These Best Films)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, लोकांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. बॉलिवूडमध्ये ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्रद्धाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून केली होती मात्र ‘आशिकी 2’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. यानंतर ‘एक व्हिलन’ ‘हसीना पारकर’, ‘छिछोरे’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘स्त्री’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

श्रद्धा कपूरची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच चित्रपट निर्मात्यांना तिला आपल्या चित्रपटात घ्यायची इच्छा आहे. पण अनेकदा अभिनेता किंवा अभिनेत्री वेळेअभावी किंवा स्क्रीप्ट नापसंतीमुळे ऑफर नाकारतात. श्रध्दासोबत हे एकदा नाही तर अनेकदा घडले आहे. अनेकवेळा तिने या ना त्या कारणाने सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत.

आरआरआर

 प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या चित्रपटांचा भाग होण्याचे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. मात्र जेव्हा श्रद्धा कपूरला त्यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात काम करण्याची ऑफर आली तेव्हा तिने ही ऑफर नाकारली. सुरुवातीला चित्रपटाच्या टीमने श्रद्धाला महत्त्वाची भूमिकेची ऑफर दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धाला चित्रपटात ज्युनियर एनटीआरच्या विरुद्ध पात्राची ऑफर देण्यात आली होती. परंतु वेळे अभावी अभिनेत्रीला ही ऑफर स्विकारता आली नाही त्यामुळे इच्छा नसतानाही तिला या चित्रपटात काम करण्यास नकार द्यावा लागला.

लकी

एका शाळेत श्रद्धा कपूरचा अभिनय पाहून सलमान खान तिच्यावर खूप प्रभावित झाला होता. श्रद्धाने आपल्या करीअरची सुरुवात लकी या चित्रपटातून करावी अशी त्याची इच्छा होती. पण त्यावेळी श्रद्धाला आपले शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यामुळे तिने सलमानची ऑफर नाकारली. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती परदेशात गेली.

सायना

 सायना नेहवालच्या बायोपिक चित्रपटाची ऑफरही परिणीती चोप्राच्या आधी श्रद्धा कपूरला मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमूल गुप्ते यांनी चित्रपटासाठी श्रद्धाला साइन केले होते. अभिनेत्रीनेही या चित्रपटाची तयारी सुरू केली होती. पण अचानक श्रद्धा या चित्रपटातून का बाहेर पडली हे समजले नाही. यानंतर परिणीती चोप्राला या चित्रपटासाठी साइन करण्यात आले.

रामायण

मिळालेल्या माहितीनुसार लव रंजन यांना श्रद्धा कपूरला आपल्या आगामी रामायण या चित्रपटात कास्ट करायचे होते. पण आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे श्रद्धाने ती ऑफर नाकारली. पण श्रद्धाने या गोष्टीचे खंडण करत तिला या चित्रपटाची ऑफर आलीच नसल्याचे सांगितले.