श्रद्धा कपूरने पारंपरिक नऊवारी साडी नेसून साजरा...

श्रद्धा कपूरने पारंपरिक नऊवारी साडी नेसून साजरा केला गुढीपाडवा, आपल्या चाहत्यांना दिल्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Shraddha Kapoor Celebrates Gudi Padwa In Traditional Nauvari Saree, Wishes Fans On The ‘Marathi New Year’)

आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण धुमधडाक्यात साजरा होत आहे. गुढीपाडव्याच्या या खास दिनादिवशी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नऊवारी साडी नेसून हा सण साजरा केला आहे. तिने आपले हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नऊवारी साडीत श्रद्धाचं सौंदर्य अतिशय खुलून दिसते आहे. तिने आपल्या चाहत्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एरव्ही देखील वेस्टर्न लूक असो वा देशी स्टाईल श्रद्धा कपूर आपले फॅशनेबल फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मग गुढी पाडव्याची संधी ती कशी सोडणार?

सोशल मीडिया वर पारंपरिक साडीतील आपला फोटो शेयर करत श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिलंय ”नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Gudi Padwa!”

गुढीपाडव्याबद्दल बोलताना, श्रद्धा कपूरने शेअर केले, “गुढीपाडवा, नवरात्री आणि उगादी या सर्व सणांसह, मी नवीन वर्षाची सुरुवात आनंदी, आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करण्यास उत्सुक आहे.

मी माझ्या दिवसाची सुरुवात घरीच बनवलेल्या महाराष्ट्रीयन पदार्थाने केली आहे. सेटवर उपस्थित असलेल्या माझ्या टीमसाठी मी महाराष्ट्रीयन पदार्थही घेतला आहे. आजचा दिवस आपल्या कुटुंबियांसोबत आणि जवळच्या मित्रांसोबत घालवायचा आणि त्यांच्यासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण जपण्याचा आहे.

याआधीही श्रद्धा कपूरने २०२० मध्ये आजी, आई आणि स्वतःचा फोटो शेअर केला होता. या चित्रात सर्वांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन साड्या परिधान केल्या आहेत.