हातात लाल चुडा, अंगात काळी बिकिनी घालून श्रद्धा...

हातात लाल चुडा, अंगात काळी बिकिनी घालून श्रद्धा आर्याने शेअर केले हनीमूनचे मस्तीखोर फोटो (Shraddha Arya Shares Sizzling Pics In Black Bikini And Red Chuda From Her Honeymoon Destination)

‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील डॉ. प्रीता अरोडा म्हणजेच श्रद्धा आर्या सध्या आपला पती राहुल नागल याच्यासोबत मालदीवच्या बेटांवर हनीमूनसाठी गेली आहे. तेथे हातात लाल चुडा, अंगात काळी बिकिनी घालून श्रद्धाने त्यांचे मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या आवडत्या संस्कारी सुनेचा सेक्सी बेब अवतार पाहून चाहतेही अचबिंत झाले आहेत.

लाल चुडा… अन्‌ काळ्या बिकिनीतील तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेडं केले आहे. या फोटोंत ती आपल्या पतीसोबत पोज देताना दिसत आहे. यापूर्वीही तिने पती राहुलसोबत फोटो पोस्ट केले होते. काळ्या बिकिनीमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना श्रद्धा अतिशय हॉट दिसते आहे. सोबत तिने लाल रंगाचा प्रिंटेड स्कार्फही घेतला आहे. बिकिनीसोबत लाल चुडा हे तिचं कॉम्बीनेशन चाहत्यांना विशेष आवडलं आहे. त्यामुळे ती नव्या नवरीसारखी दिसत असल्याचे नेटकरी म्हणताहेत.  

या आधी श्रद्धाने पांढऱ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंवरून तिच्या पतीनेच तिला ट्रोल केले होते. त्याने तिच्या बिकिनी पोजची कॉपी करून तो फोटो शेअर केला होता.

श्रद्धा आर्याचे लग्न १६ नोव्हेंबर २०२१ रोजी नौदलाचे कमांडर राहुल नागलसोबत झाले होते. लग्नानंतर दोघेही खूप व्यस्त होते, त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नव्हते. पण, आता श्रद्धा आणि राहुल वेळ मिळताच मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत. अन्‌ तेथील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहेत.

श्रद्धाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर ती २००४ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनिस्टर्स की खोज’ या टॅलेंट शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर तिने ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’, ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘कुमकुम भाग्य’सह अनेक शोमध्ये काम केले आहे. ‘कुंडली भाग्य’मधील फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रीता अरोराच्या भूमिकेने तिला अधिक यश मिळालं आहे.