धक्कादायक! १५ वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंडश...

धक्कादायक! १५ वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंडशी सुश्मिता सेनची फारकत : रोहमन शॉलने सोडले तिचे घर (Shocking : Shshmita Sen Broke Up With Boyfriend 15 Yrs. Younger Rohman Shawl Left The Actress House)

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Shshmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. तसेच रोहमन हा सुष्मिता सेनसोबत राहत होता. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण आता रोहमन आणि सुष्मिता यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. सुष्मिताने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

Shshmita Sen

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमन यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रोहमन आणि सुष्मिताने ब्रेकअप केला असल्याचे समोर आले आहे. तसेच रोहमनने सुष्मिताचे घर सोडले असून एका मित्राच्या फ्लॅटवर तो शिफ्ट झाला आहे. आता सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘आम्ही मैत्रीपासून सुरुवात केली होती आणि आम्ही शेवटपर्यंत मित्र राहू. नातं संपलं असलं तरीही प्रेम कायम राहील.’

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

२०२१ सालच्या सुरुवातीलाच सुष्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने एका वाईट नात्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे असं लिहिलं होतं. तिच्या या पोस्टनंतर लोकांनी त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज लावला होता. परंतु तिच्या या पोस्टनंतर दोघांचे अनेक रोमँटिक फोटो समोर आले, त्यावरून त्यांच्यात सर्वकाही ठिक असल्यासारखं वाटलं होतं.

Shshmita Sen

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

Shshmita Sen

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलच्या वयामध्ये खूप मोठे अंतर आहे. सुष्मिता ४६ वर्षांची असून रोहमन फक्त ३१ वर्षांचा आहे. एका फॅशन गालामध्ये दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालविला. प्रेमाची कबूली दिल्यानंतर दोघं लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. रोहमनचं सुष्मिताच्या दोन्ही मुलीं, रेनी आणि अलीशासोबत चांगलं बॉन्डिंग आहे. ‘सुष्मिता, तिच्या मुली आणि मी एक कुटुंब आहे. कधी मी तिच्या मुलींचा वडील असतो तर कधी आमच्यामध्ये मैत्रीचे नाते असते. आमच्यामध्ये भांडणे देखील होतात. आम्ही एका कुटुंबासारखे राहतो. आम्ही एकत्र मजामस्ती करत असतो,’ असे रोहमनने एका मुलाखतीत म्हटले होते.

Shshmita Sen

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

Shshmita Sen

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं तर रोहमनने सुष्मिताला प्रपोज केलं होतं आणि सुष्मिताने  त्याला कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला होता. त्यानंतर २०१९ साली दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या, परंतु असं नसून अजूनही आम्ही एकमेकांना डेट करण्यात आनंदी असल्याचं तिनं सांगितलं होतं.

Shshmita Sen

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम नोएडामध्ये राहणारा रोहमन शॉल एक फ्रीलान्स मॉडेल आहे. किंबहुना मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठीच तो नोएडातून मुंबईला आला होता. आतापर्यंत रोहमनने सब्यसाची व्यतिरिक्त अनेक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससोबत शो केले आहेत. म्हणूनच सुष्मिता आणि त्याची पहिली भेट एका फॅशन गालामध्येच झाली होती. रोहमनच्या आधी सुष्मिताचं नाव विक्रम भट्ट, संजय नारंग, सबीर भाटिया, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, मानव मेनन, बंटी सचदेव, मुदस्सर अजीज आणि वसीम अकरम इत्यादींसोबत जोडले गेले आहे.