धक्कादायक! कुस्तीत हरली म्ह...

धक्कादायक! कुस्तीत हरली म्हणून रितिका फोगाटची आत्महत्या (Shocking News : Ritika Phogat Commits Suicide After Loosing Wrestling Tournament)

राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने हरली म्हणून रितिका फोगाटने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रितिका केवळ १७ वर्षांची होती. या धक्कादायक बातमीमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. रितिकाच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येतंय.  
रितिका ही दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण आहे. कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाचं बरंच मोठं नाव आहे. रितिकालाही आपल्या बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचं होतं. त्यासाठी ती गेली ५ वर्षे तिचे मामा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती.
नुकतंच तिने भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्तरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने हार पत्करावी लागली. आपली हार सहन न झाल्याने रितिकाने सोमवारी रात्री खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला.

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी रितिकाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला. त्यानंतर रितिकाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आलं आहे.

‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय्‌ आपली रडकथा!’