SHOCKING! ‘नागिन ३’ मालिकेचा अभिनेता पर्...

SHOCKING! ‘नागिन ३’ मालिकेचा अभिनेता पर्ल पूरी, बलात्काराच्या आरोपावरून अटकेत (SHOCKING! ‘Naagin 3’: actor Pearl V Puri arrested for alleged rape charges)

टेलिव्हिजन क्षेत्रातून एकापाठोपाठ एक धक्कादायक बातम्या येत आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील करण मेहरावर त्याच्या पत्नीने मारहाण केल्याचे आरोप केल्याने तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. त्यांच्या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. तर आता टी. व्ही. मालिकेतील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्यावर गंभीर आरोप लागले आहेत. त्यामुळे तो अडचणीच्या फेऱ्यात अडकला आहे.

त्याचं नाव आहे पर्ल व्ही. पुरी. एकता कपूरच्या ‘नागिन ३’ या सुपरनॅचरल ड्रामा मालिकेतला तो आघाडीचा कलाकार आहे. बलात्कार आणि छेडछाड केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर एका तरुण स्त्रीने बलात्काराचा आरोप लावला आहे. ती स्त्री आणि तिच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आले आहे.

बलात्काराचा गंभीर आरोप केलेली महिला कोण आहे, ते अद्याप कळलं नाही. तिचे पर्लशी कशा प्रकारचे संबंध आहेत, तेही अद्याप उघड झालेलं नाही. पण पर्ल मात्र पोलिसी कचाट्यात सापडला आहे.

हा पर्ल आणि करिश्मा तन्ना डेटिंग करत असल्याच्या चर्चा मध्यंतरी बऱ्याच रंगात आल्या होत्या. मात्र या दोघांनी या संबंधाबाबत होकार दिलेला नव्हता. मात्र त्यांचा ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या गेल्या वर्षी पसरल्या. वेगळे झाले तरी दोघांत दोस्ती कायम राहिली होती.

पर्लला २०१३ साली ‘फिर ना माने बदतमीज दिल’ मध्ये नायकाची भूमिका मिळाली. ‘नागार्जुन एक योद्धा’ आणि ‘बेपनाह प्यार’ मध्ये नंतर तो चमकला. पण ‘नागिन ३’ मधून त्याला जास्त लोकप्रियता मिळाली. सध्या ‘ब्रह्मराक्षस – २’ मध्ये तो अंगद मेहरा हे पात्र सादर करतो आहे.