आईने पबजी खेळायला दिले नाही म्हणून मुलाने आईचाच...

आईने पबजी खेळायला दिले नाही म्हणून मुलाने आईचाच घेतला जीव, बहिणीला धमकावून मुलाने ३ दिवस प्रेता शेजारी ठाण मांडले (Shocking! 16 Year Old Lucknow Boy Kills Mother For Not Letting Him Play Mobile Game PUBG)

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचाच जीव घेतला आहे. या मुलाला पबजी गेमचे इतके व्यसन लागले होते की, जेव्हा त्याच्या आईने त्याला तो गेम खेळण्यास बंदी घातली, तेव्हा रागाच्या भरात त्याने घरातील लायसन्स असलेल्या बंदूकीने गोळ्या झाडून आपल्या आईचीच हत्या केली. मुलाचे वडील नवीन सिंह हे आर्मी ऑफिसर आहेत. मुलाचे नाव किशोर असून त्याच्या आईचे नाव साधना असे होते. त्या ४० वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या मुलासोबत आणि ९ वर्षाच्या मुलीसोबत राहायच्या. आपल्या मुलाला पबजीचे व्यसन लागल्यामुळे ती सतत त्याला तो गेम खेळण्यापासून अडवत असे. शनिवारी जेव्हा साधना यांनी किशोरला पबजी खेळू दिले नाही तेव्हा रागाच्या भरात त्याने त्यांना 6 गोळ्या झाडल्या. त्यामुळे साधना सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.

गोळ्या झाडल्यानंतर शेजारच्या खोलीत असलेली किशोरची छोटी बहिण बाहेर आली. समोरील प्रकार पाहून ती जागीच थबकली. त्यावेळी तिच्या क्रूर भावाने तिला कोणला सांगितलसं तर तुला सुद्धा मारून टाकीन अशी धमकी दिली. आणि त्याने त्याच्या बहिणीला दुसऱ्या खोलीत डांबून ठेवले. प्रेताला दुर्गंधी यायल्या लागल्यावर तो तिथे रुम फ्रेशनर मारायचा पण जेव्हा जास्तच दुर्गंध येऊ लागला तेव्हा तो घाबरला आणि त्याने घडला प्रकार स्वत:च्या मनाने वेगळा बनवून त्याच्या वडिलांना फोन करून सांगितला.  

किशोरने त्याच्या वडिलांना सांगितले की, एक मुलगा आला त्याने आईला मारून टाकले नंतर त्याने आम्हा भावा-बहीणीला शेजारच्या खोलीत डांबून आम्हालाही मारण्याची धमकी दिली. तो इथून निघून गेल्यावर मी तुम्हाला फोन केला. मुलाचे फोनवरचे बोलणे ऐकून नवीनच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर नवीन यांनी लगेचच त्यांच्या शेजाऱ्यांना घडला प्रकार कळवला. शेजारी तात्काळ तिथे पोहचले व दोन्ही मुलांना आधी बाहेर काढले. किशोरने शेजाऱ्यांना देखील तेच सांगितले की, कोणत्या तरी मुलाने येऊन आईला मारून टाकले. घरातील प्रेताला खूपच दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना ती बातमी कळवली.

पोलिसांनी घराला सील केले व पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. जेव्हा पोलिसांनी किशोर आणि त्याच्या लहान बहिणीची वेगवेगळी चौकशी केली तेव्हा खरा प्रकार समोर आला. त्यानंतर किशोरने सांगितले, घरात कधी काही चुकीचे घडले की त्याचा आळ नेहमी माझ्यावरच यायचा. शनिवारी घरातील १० हजार रुपये गायब झाले होते तेव्हा देखील ते मीच चोरले असे समजून आईने मला खूप मारले. पुढे त्याने सांगितले की त्याला पबजी खेळाची खूप सवय लागली होती. ते खेळताना त्याची आई नेहमी त्याला टोकायची. किशोरची आई त्याला जे काही मारायची किंवा ओरडायची त्याचा त्याला कधीच काही फरक पडला नाही.

सध्या साधनाची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली असून पुढील तपासणी चालू आहे.