शोएब मलिकची कथित गर्लफ्रेंड आयशा ओमरने भारताबद्...

शोएब मलिकची कथित गर्लफ्रेंड आयशा ओमरने भारताबद्दल केले धक्कादायक विधान(Shoaib Malik’s alleged girlfriend Ayesha Omar made a shocking statement about India)

काही महिन्यांपूर्वी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. शोएबच्या एका नातेवाईकानेच ही माहिती दिली होती. पाकिस्तानी मॉडेलसोबत शोएबची वाढलेली जवळीक हे त्या घटस्फोटाचे कारण असल्याचे बोलले जात होते. या सर्व प्रकारावर शोएब आणि सानियाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आले नसले तरी आता शोएबची कथित गर्लफ्रेंड आयशा उमरने यावर भाष्य केले आहे.

शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाला आयशाला जबाबदार ठरवल्यामुळे तिने वैतागून यावर  स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली,  “मी कधीही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. प्रत्येकजण मला ओळखतो आणि हे मी सांगण्याची गरज नाही,” असं आयशा म्हणाली. ‘अफवा आधी सीमेपलीकडून पसरवल्या गेल्या आणि नंतर तिच्याच देशातील मीडियाने उचलून धरल्या.’असेही ती म्हणाली.

मध्यंतरी शोएब आणि आयशाचे अंडरवॉटर फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. आणि नेमक्या त्याच दरम्यान त्याच्या व सानियाच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही उधाण आलेले. त्यामुळे लोकांनी या दोन गोष्टींचा एकत्र संबंध जोडला होता. विशेष म्हणजे घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान या दोघांनी मिर्झा मलिक शोची घोषणा केली होती.