शोएब इब्राहिमने नवीन वर्षानिमित्त पत्नी दीपिकाल...

शोएब इब्राहिमने नवीन वर्षानिमित्त पत्नी दीपिकाला दिली महागडी कार, पोस्ट शेअर करत लिहिली मनातली गोष्ट(Shoaib Ibrahim gifts luxury car to wife Dipika Kakar on New Year, Shares heartfelt note on social media)

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असून सोशल मीडियावर त्यांचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. दीपिका बऱ्याच दिवसांपासून टीव्हीपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. चाहते देखील नेहमी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. आता नववर्षाच्या मुहूर्तावर शोएब इब्राहिमने दीपिका कक्करला एवढी महागडी भेट दिली आहे की दीपिकाचे चाहतेही खूश आहेत.

दीपिका कक्करचे 2023 हे नवीन वर्ष अगदी आनंदाने सुरू झाले आहे, अभिनेत्रीला तिच्या पतीकडून महागडे गिफ्ट मिळाले आहे. शोएबने नववर्षानिमित्त दीपिकाला एक नवीन BMW कार गिफ्ट केली आहे. दीपिका आणि शोएबने हा खास क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. नवीन कार आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना त्यांनी नवीन वर्षाचा हा नवा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.

शोएब इब्राहिमने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी दीपिका कक्करसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये शोएब इब्राहिम दीपिकाला किस करताना आणि तिच्यासोबत रोमँटिक क्षण शेअर करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये त्याची नवीन पांढऱ्या रंगाची कारही दिसत आहे, जी त्याने दीपिकाला गिफ्ट केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शोएबने मनातली गोष्ट असे म्हणत लिहिले की, “२०२२ या वर्षाचा प्रवास खरोखरच अद्भुत होता. सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते आणि आज आम्ही इथे उभे आहोत. कुटुंबासह, आम्ही हा मोठा आनंद साजरा करत आहोत. हा क्षण आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद, आणि खूप आनंदाने भरलेला आहे… ही खास गोष्ट फक्त तुझ्यासाठी आहे दीपिका. विशेष म्हणजे नवीन BMW X7 ची किंमत 1.18 ते 1.78 कोटींदरम्यान आहे.

त्याचबरोबर नववर्षाच्या मुहूर्तावर पतीकडून नवी कार मिळाल्याने दीपिकाच्या आनंदला बहर आला आहे. नवीन कार आणि कुटुंबासोबत पोज देताना तिने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये एक खास नोट लिहून आनंद व्यक्त केला. तिने लिहिले, “आमच्या ‘बीस्टला घरी घेऊन जात आहोत!!! आमची नवीन BMW X7!! अल्हमदुलिल्लाह.”

हे फोटो पाहिल्यानंतर या जोडप्याचे चाहतेही खूप आनंदी दिसत आहेत आणि दीपिकाला नवीन कारसाठी शुभेच्छाही देत ​​आहेत.

शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अभिनेत्रीचे वाढलेले वजन पाहून चाहत्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला होता. पण त्यांच्या व्लॉगमध्ये या जोडप्याने सत्य उघड केले आणि असे काहीही नसल्याचे सांगितले.