‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकल्य...

‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मराठमोळ्या शिव ठाकरेचं लक्ष बिग बॉस १६ वर… आई म्हणाली, ‘माझा मुलगा शिवच विजेतेपद जिंकणार.’ (Shiv Thakare Mother Reply On Big Boss 16 Winner Question Says, ‘My Son Will Win The Trophy’)

सध्या छोट्या पडद्यावर दोन कार्यक्रमांची जोरदार चर्चा आहे. एकीकडे ‘बिग बॉस मराठी ४’ चा अंतिम सोहळा जवळ आला आहे तर दुसरीकडे ‘बिग बॉस १६’ देखील चर्चेत आहे. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातही हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे बिगबॉस 16 चं पर्व गाजवत आहे आणि या सिझनच्या विजेतेपदाचा तगडा दावेदारही आहे. शिवने आपल्या खेळाने सगळ्यांची मनं जिंकून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

इतकंच नाही तर शिवचा खेळ पाहून मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकही त्याच्या पाठीशी उभे आहेत. हिंदी प्रेक्षकांनाही त्याने भुरळ घातलीये. ‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आता त्याने आपलं लक्ष ‘बिग बॉस १६ वर केंद्रित केलं आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी तो प्रचंड मेहनत करताना दिसतोय. मात्र तुमचा मुलगा हे विजेतेपद जिंकणार का, या प्रश्नावर त्याच्या आईने दिलेलं उत्तरही ऐकण्यासारखं आहे.

शिवची आई त्याच्यासाठी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. ती शिवचा आधारस्तंभ आहे. आता खेळाच्या अखेरच्या काही दिवसात शिवच्या आईला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यांना विचारलं गेलं की शिव ही ट्रॉफी जिंकू शकेल का? त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली.

त्या म्हणाल्या, ‘बिग बॉस १६’ मध्ये शिव ज्या प्रकारे खेळत आहे त्यावर मी खूप खुश आहे. मला त्याचा खेळ आवडतोय. तो फक्त माझा मुलगा आहे म्हणून मी असं बोलत नाहीये तर विजेता होण्याचे सर्व गुण माझ्या शिवमध्ये आहेत आणि माझ्या या वाक्यावर सर्व प्रेक्षकही नक्कीच सहमत होतील. त्याचा खेळ सगळ्यांनाच आवडतोय. आशा करते की शिव नक्कीच ट्रॉफी जिंकून येईल.’

शिवच्या आईने दिलेल्या या उत्तराने त्याच्या चाहत्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. आता ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी नक्की कोण जिंकणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र शिव या विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्याच्या खेळाने खरंच नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. तर त्याचे चाहते शिवसाठी प्रार्थना करत आहेत.