अंगूरी भाभी – शिल्पा शिंदे एका एपिसोडसाठी...

अंगूरी भाभी – शिल्पा शिंदे एका एपिसोडसाठी भरपूर पैसे घेते… किती? ते जाणून घ्या (Shilpa Shinde Who is Famous As Angoori Bhabhi Used to Charge Huge Amount For Per Episode)

दर्शक टेलिव्हिजनवर अनेक मालिका पाहतात, ‘भाभीजी घर पर हैं’ ही यापैकीच एक. ही मालिका दर्शकांचे मनोरंजन तर करतेच, शिवाय त्यांना खळखळून हसायला लावते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने दर्शकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील अंगुरी भाभी हे मध्यवर्ती पात्र लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सध्या या मालिकेत शुभांगी अत्रे ही अंगुरी भाभीची भूमिका करते आहे. तिच्या आधी शिल्पा शिंदे ही भूमिका करत होती. आता शिल्पाने हा शो सोडला असला तरी तिची अंगुरी भाभीची ओळख मात्र तशीच राहिली आहे. ती या भूमिकेसाठी किती पैसे घेत होती ते ऐकून तुम्ही चकीत व्हाल.

शिल्पाच्या आत्तापर्यंतच्या कमाईचा आकडा १४ कोटीपर्यंत पोहोचला आहे. शिल्पा भाभीजीच्या भूमिकेसाठी एका एपिसोडचे ३५,००० रुपये घेत होती. शिल्पा ही बिग बॉस ११ सीझनची विजेती स्पर्धकही आहे. तेथेही प्रत्येक एपिसोडसाठी ती जवळपास ६ ते ७ लाख रुपये फीस आकारत होती.

शिल्पाने भाभीजी घर पर हैं मालिकेतील अंगुरी भाभी छानच वठवली होती. तिची ‘सही पकडे है’ आणि ‘हाय दैया’ बोलण्याची ढब लोकांनी विशेष पसंत केली. नंतर नंतर जसजशी तिची भूमिका लोकांना आवडत गेली, तिचे मानधनावरून निर्मात्यांशी खटके उडू लागले, अन्‌ तिने ही मालिका सोडली. पण आजही अंगुरी भाभी म्हटलं की शिल्पा शिंदेच डोळ्यांसमोर येते.