शिल्पानं सुरु केलं नवीन पिझ्झा रेस्टॉरंट (Shilp...

शिल्पानं सुरु केलं नवीन पिझ्झा रेस्टॉरंट (Shilpa Shetty’s New Pizza Hotel In Mumbai)

बॉलीवूडमधील फिटनेस फ्रीक शिल्पा शेट्टीने आता मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवूड सेलिब्रेटी उद्योगविश्वात येणं हे काही नवीन नाही. यापूर्वी देखील अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सलमान खान, सैफ अली खान, आदित्य पांचोली, आमिर खान यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. त्यामध्ये शिल्पा शेट्टीचंही नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. आपण शिल्पाला आतापर्यत वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये जज म्हणून पाहिलं आहे. शिल्पा आणि तिचा फिटनेस हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

कोरोनाच्या काळात शिल्पानं सोशल मीडियाच्या आधारे नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे मनोरंजन केले होते. तिनं चाहत्यांना फिटनेसचे धडेही दिले होते. आता शिल्पा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं सुरु केलेलं हॉटेल. शिल्पा शेट्टीने आता मुंबईत पिझ्झा रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीने खूप आधीच रेस्टॉरंट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ‘बॅस्टीन बाय शिल्पा शेट्टी’ नावाचे मुंबईतील वरळी येथे तिचे रेस्टॉरंट आहे. आता शिल्पा शेट्टीने नुकतेच मुंबईत जे पिझ्झा रेस्टॉरंट उघडले आहे त्या रेस्टॉरंटचे नाव ‘बिझ्झा’ आहे.

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा तिच्या नवीन रेस्टॉरंट ओपनिंगनंतर बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पिझ्झा देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पापाराझींशी बोलताना शिल्पा म्हणते, ‘अशावेळी तोंड गोड करायचे असते, पण आज मी तोंड पिझ्झा करतेय’. शिल्पाची ही स्टाईल सोशल मीडियावर चाहत्यांना आवडत आहे.

शिल्पा तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या ओपनिंगमध्ये मुलगा विआन आणि मुलगी समिशासोबत पोज देताना दिसली. शिल्पा शेट्टी तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. शिल्पा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. ‘बिझ्झा’च्या ओपनिंगच्या वेळीही शिल्पाने तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांची मने जिंकली. रेस्टॉरंट ओपनिंग दरम्यान शिल्पा अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. शिल्पाने लाल रंगाचा ट्युनिक ड्रेस घातला होता. लूक पूर्ण करण्यासाठी शिल्पाने एका हातामध्ये कडे घातले होते आणि केस मोकळे ठेवले होते.