“शिल्पा शेट्टी खरंच तुझ्यासोबत आहे की हा फक्त द...

“शिल्पा शेट्टी खरंच तुझ्यासोबत आहे की हा फक्त दिखावा?”, चाहत्याच्या प्रश्नावर राज कुंद्राचं भन्नाट उत्तर (Shilpa Shetty’s Hubby, Raj Kundra Replies To A Troll Who Asks If His Wedding Is A ‘Staged Act’)

पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाला. नुकतंच राजने ट्विटरवर नेटकऱ्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. पॉर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक झाल्यानंतर शिल्पा त्याला घटस्फोट देणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ही जोडी अद्याप एकत्र आहे. यावरूनच एका ट्विटर युजरने राजला प्रश्न विचारला. “तू आणि शिल्पा शेट्टी खरंच एकमेकांसोबत आहात की हे सर्व नाटक आहे”, असा प्रश्न संबंधित नेटकऱ्याने विचारला. त्यावर राजनेही त्याच्या अंदाजात उत्तर दिलं.

नेटकऱ्याच्या या प्रश्नावर –

“हाहाहाहा.. मला हा प्रश्न आवडला. प्रेम हे नाटक नसतं आणि ते दिखाव्यासाठी करता येत नाही. येत्या 22 नोव्हेंबर रोजी आमच्या लग्नाचा 13 वा वाढदिवस आहे. त्यादिवशी आम्हाला शुभेच्छा द्यायला विसरू नकोस”, असं उत्तर राजने दिलं.

राज आणि शिल्पाने 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना समिशा आणि वियान अशी दोन मुले आहेत. जवळपास वर्षभरानंतर राज ट्विटर अकाऊंटवर पुन्हा सक्रिय झाला आहे.

जुलै 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक झाली होती. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात जवळपास दोन महिने राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्याने केला आहे.