शिल्पा शेट्टीच्या 10 वर्षीय मुलाने सुरु केला अन...

शिल्पा शेट्टीच्या 10 वर्षीय मुलाने सुरु केला अनोखा व्यवसाय, सेलिब्रेटींनी केले विआनचे तोंडभरुन कौतुक (Shilpa Shetty’s 10 Year Old Son Viaan Raj Kundra Starts A Unique Business, Celebs Praises Him)

शिल्पा शेट्टीचा 10 वर्षांचा मुलगा विआन राज कुंद्राने कस्टमाइज्ड स्नीकर्स, कपडे, बॅग आणि बरेच काही गोष्टींचा अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. छोट्या विआनने आपल्या वडिलांसोबत एक ‘युनिक बिझनेस व्हेंचर’ सुरू केले आहे. शिल्पा शेट्टीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या मुलाच्या म्हणजेच विआनच्या व्यवसायाविषयी अधिकृत घोषणा केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा १० वर्षांचा मुलगा विआन याने एक ‘युनिक बिझनेस व्हेंचर’ सुरू केले आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विआनच्या स्टार्टअपबद्दल सांगत आहे. त्यावेळी तिने खास आपल्यासाठी बनवलेल्या कस्टमाइज्ड स्नीकर्सबद्दल सांगत आहे. या व्हिडिओमध्ये, शिल्पाने असेही सांगितले की विआनने या स्नीकर्सचे नाव VRKICKS ठेवले आहे. या कस्टमाइज्ड स्नीकर्सची किंमत ४९९९ रुपये आहे.

आपल्या लेकाचा अभिमान बाळगत शिल्पा शेट्टीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, माझा मुलगा विआन राजचा पहिला आणि अनोखा व्यवसाय उपक्रम. यात ‘कस्टमाइज्ड स्नीकर्स’ बनवले जातील. लहान मुलांना आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. उपक्रमाच्या संकल्पनेपासून ते डिझाईन आणि अगदी व्हिडिओपर्यंत सर्व काही विआनने केले आहे. उद्योगपती आणि दिग्दर्शिका शिल्पा शेट्टीने पुढे लिहिले की, महत्वाची गोष्ट म्हणजे इतक्या लहान वयात विआन आपल्या कमाईतील काही रक्कम दान करणार आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खानने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना विआनच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे. शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीने कमेंटमध्ये लिहिले की, ‘माझ्या कस्टमाइज्ड स्नीकर्सची आत वाट पाहू शकत नाही. मावशीला तुझा अभिमान आहे.’