शिल्पा शेट्टी ने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक (...
शिल्पा शेट्टी ने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक (Shilpa Shetty Takes Break From Social Media)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे प्रचंड चर्चेत असते. ती सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. दररोज ती आपल्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. परंतु आता मात्र चाहत्यांना शिल्पाला सोशल मीडियावर फॉलो करत येणार नाही. कारण शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे. (Shilpa Shetty break from social media). अभिनेत्रीने स्वतः एक ब्लँक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक फिटनेस आणि स्टाईल आयकॉन म्हणून पाहतात. कित्येकांना शिल्पा शेट्टीसारखी फिगर आणि सौंदर्य कमावण्याची इच्छा आहे. तसेच शिल्पा शेट्टीसुद्धा तिच्या पोस्टद्वारे लोकांना फिटनेस आणि आरोग्य इत्यादीसाठी मार्गदर्शन करत असते. पण आज शिल्पाने चाहत्यांची निराशा केली आहे. कारण अभिनेत्रीने नुकतंच पोस्ट शेअर करत सांगितलं की, तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटर या दोन्हींमधून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. ही पोस्ट समोर येताच अभिनेत्रींचे चाहते निराश होऊन कमेंट्स करत आहेत.

शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय,- ‘फक्त एकच-एक गोष्टीचा कंटाळा आला आहे. सर्व काही सारखे दिसत आहे… जोपर्यंत मला नवीन कोणता अवतार मिळत नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जात आहे.’ अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. शिवाय सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिल्पाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीचे ट्विटरवर ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर २५.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.

शिल्पाच्या या निर्णयामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत, तर काही ट्रोलर्स तिच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर पॉर्न इंडस्ट्रीबद्दल काहीतरी बोला, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हो, आता पॉर्न फिल्ममेकरला सपोर्ट करा. हे सर्व सोशल मीडियाच्या हद्दीबाहेर ऑफलाइन आहे.’ एका ट्रोलरने लिहिले, ‘प्लॅस्टिक सर्जरी करून या’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘कृपया हा सल्ला तुझी बहिण शमिता हिलाही द्या.’ नेटकरी अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत शिल्पाचा क्लास घेत आहेत.
Soooo bored of the monotony, everything looking the same… going off social media till I find a new avatar 🙆🏻♀️ pic.twitter.com/yj9VDzEEF3
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) May 12, 2022

शिल्पाच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ती गोव्यात आहे आणि रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजची शुटींग करत आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय देखील आहेत.