शिल्पा शेट्टीची द्विधा मनःस्थिती, आयुष्याबाबत म...

शिल्पा शेट्टीची द्विधा मनःस्थिती, आयुष्याबाबत मोठा निर्णय घेताना सोशल मीडियावर मागितला सल्ला (Shilpa Shetty Seems Confused On Taking A Major Life Decision, Seeks Fan’s Opinion On Social Media)

मागील काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी तिच्या खाजगी जीवनामुळे सतत चर्चेत असते. अलिकडेच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी केसप्रकरणी जामीन मिळाला आहे. तब्बल ६२ दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. राज कुंद्रानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती बिनधास्तपणे आपले विचार मांडताना दिसत आहे. पती घरी आल्यानंतर शिल्पानं एक पोस्ट शेअर करत आपलं मत नोंदवलं होतं. आता शिल्पानं इंस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. आयुष्याबाबत मोठा निर्णय घेताना कन्फ्युज असल्याचं शिल्पानं म्हटलं आहे. त्यामुळे तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला मागितला आहे.

Shilpa Shetty Seems Confused

शिल्पा शेट्टीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं आहे की, ती आयुष्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मात्र, ती कंफ्यूज आहे. शिल्पानं एका पुस्तकात प्रसिद्ध झालेला मजकूर पोस्ट केला आहे. ‘खुद पर निर्भर करना.’, असं या पोस्टचं शीर्षक आहे. ‘कठीण प्रसंगांना सामोरे जाताना चरित्रसंपन्न व्यक्ती स्वतःवर अवलंबून असते. ती भविष्याबाबत मोठा निर्णय घेते. ती तिच्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी स्विकारते. प्रत्येक निर्णय आपला आहे, असं म्हणते.’, असं शिल्पानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Shilpa Shetty Seems Confused

शिल्पा शेट्टी पुढे म्हणाली, ‘कठीण प्रसंगात मला अनेकांची साथ मिळाली. पण मला समजलं की, आयुष्यातील कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे हे माझ्यावर अवलंबून आहे.’ मात्र, शिल्पाने एका द्विधा मन:स्थितीत शेवटी, आपण निवडलेल्या प्रत्येक निर्णयासाठी आपण जबाबदार आहोत. आपल्याला आपले निर्णय घ्यावे लागतील आणि त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. योग्य की अयोग्य, ते आपल्यावर अवलंबून आहे. असे म्हणत बाण दाखवून ‘हे’ करु का ‘ते’ असा प्रश्न उभा केला आहे.’

Shilpa Shetty Seems Confused

शिल्पाची नवी पोस्ट पाहून तिचे चाहते पुरते गोंधळून गेले आहेत आणि त्यांना जाणून घ्यायचे आहे की शिल्पा कोणत्या गोष्टीबाबत एवढी कन्फ्यूज आहे. चाहते तिच्या मनातील गोंधळाचा संबंध राज कुंद्राशी लावत आहेत. दरम्यान शिल्पा राजला घटस्फोट देणार असल्याचेही बोलले जात होते, परंतु सध्या तरी शिल्पाने असं काहीच म्हटलेलं नाही. त्यामुळे चाहते अजूनच बुचकळ्यात पडले आहेत.