शिल्पा शेट्टी स्वतःला फिट ठेवण्यासाठी खाते हे प...

शिल्पा शेट्टी स्वतःला फिट ठेवण्यासाठी खाते हे पीठ (Shilpa Shetty Eats This Flour Roti To Keep Herself Fit)

स्वतःला फिट ठेवणे हे वरवर पाहता सोपे वाटत असले तरी प्रत्यक्ष कृतीत आणताना डोकेदुखीच वाटते. शारीरिक व्यायामापासून ते खाण्यापिण्याच्या सवयींकडे फार बारकाईने लक्ष द्यावे लागते. अर्थात कर्वी फिगर, तेजस्वी त्वचा आणि आकर्षक व्यक्तीमत्त्व हवं असेल तर हे करणं आवश्यकच आहे. बॉलिवूडची शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत म्हणूनच नेहमी चर्चेत असते. दरवेळेस ती आपले फिटनेस सिक्रेट्‌स चाहत्यांसोबत शेअर करत असते. व्यायाम, योगा, मेडिटेशन वा सकस आहार असो शिल्पा आपली प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शिल्पाची सडसडीत शरीरयष्टी नि कमनीय बांधा ही ओळख केवळ बॉलिवूडपुरतीच नव्हे बरं का. तिचा फिटनेस सर्वसामान्य तरुण मुलींनाही प्रोत्साहित करतो. बरेचदा आपण शिल्पाला व्यायाम करतानाच पाहतो. परंतु शिल्पा तिच्या आहाराच्या बाबतीतही सतर्क असते. तुम्हाला माहीत आहे का, शिल्पा तिच्या जेवणात गव्हाच्या पिठाच्या चपात्या न खाता ज्वारीच्या भाकऱ्या खाते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

भारतात बहुतांशी लोक ज्वारीचे पीठ अतिशय आवडीने खातात. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे ज्वारी खाणाऱ्यांची संख्या कमी होत असली तरी तुम्हाला जर फीट राहायचे असेल तर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा ज्वारीच्या भाकऱ्या खाल्ल्या पाहिजेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शिल्पा म्हणते, “जर तुम्हाला तुमच्या आहारात ज्वारीचा समावेश करायचा असेल ज्वारीची भाकरी खा. ज्वारी ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि तुमची पचनशक्ती देखील चांगली होते.”

शिल्पा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी ज्वारीची भाकरी बनविण्याची कृती सांगितली आहे. ती ज्वारीची भाकरी बनवताना – एक कप पाण्यामध्ये मीठ घालून ते पाणी उकळवते. नंतर त्या पाण्यात ज्वारीचे पीठ टाकते. आता त्या पीठात ती काळे तीळ आणि तेल घालून पीठ चांगलं मळून घेते. नंतर त्याचे गोळे करून लाटण्याने ते लाटून तव्यावर भाकरी चांगली भाजून घेते.

तुम्ही देखील पाहा शिल्पाच्या ज्वारीच्या भाकऱ्या…

गव्हाच्या पीठामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यात ते त्रासदायक ठरते. याउलट ज्वारीच्या पीठाच्या भाकऱ्या तुम्ही पोटभर खाऊ शकता. त्यामुळे वजन वाढण्याचे टेँशन राहत नाही.