शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन (Shil...

शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन (Shilpa Shetty brings Lord Ganesha home)

१० सप्टेंबरपासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. देशभरातील लोक हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतात. बरेच बॉलिवूड स्टार्स देखील आपल्या घरी गणपती बाप्पा आणतात. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करते. दरवर्षी ती पती राज कुंद्रासोबत बाप्पाला घरी घेऊन येते. मात्र यावेळी ती एकटीच दोन दिवस आधीच बाप्पाला घेऊन आली आहे.

Shilpa Shetty brings Lord Ganesha home

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यात ती आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये ती मोठ्याने गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार करताना दिसत आहे.

Shilpa Shetty brings Lord Ganesha home

शिल्पाने यंदा लालबाग येथून लालबागच्या राज्याची प्रतिकृती असलेली गणपतीची मूर्ती घरी आणली आहे. यावर्षी शिल्पा गणेशोत्सव साजरा करणार की नाही याबाबत सर्व साशंक होते. परंतु शिल्पाने नेहमीच्याच उत्साहाने नाचत, वाजत-गाजत गणेशमूर्ती घरी आणली आहे.

अभिनेत्री म्हणून, शिल्पा सध्या सोनी टीव्हीच्या डान्स रिॲलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये जज म्हणून दिसत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव आल्यानंतर ती काही काळ शोपासून दूर होती. पण आता तिने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे.