जामिनावर बाहेर आल्यानंतर वडिलांसाठी विआननं लिहि...

जामिनावर बाहेर आल्यानंतर वडिलांसाठी विआननं लिहिली खास पोस्ट (Shilpa Shetty And Raj Kundras Son Viaan Shares First Instagram Post After His Father Gets Bail)

पोर्नोग्राफी प्रकरणी दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा मंगळवारी जामिनावर बाहेर आला आहे. राजला जामिन मिळाल्यानंतर त्याच्या मुलाने, विआनने इन्स्टाग्रामवर आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. विआनने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

अश्लिल व्हिडिओंची निर्मिती करणे आणि ते ओटीटीवर विकल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्रा या पोर्नेग्राफी प्रकरणी दोन महिने तुरुंगात होता. दोन महिन्यांनंतर यावेळी राजचा जामिन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज कुंद्राची तुरुंगातून सुटका करण्यात आली असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. राज कुंद्राला जामिन मिळाल्यानंतर आधी शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक सकारात्मक पोस्ट केली होती. आणि आता त्यांच्या मुलाने विआनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Shilpa Shetty, Raj Kundras Son Viaan, First Instagram Post

विआनने त्याच्या या पोस्टमध्ये त्याची आई शिल्पा आणि बहिण समिक्षासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो गणेशोत्सवाच्या वेळचा आहे. हा फोटो शेअर करत विआनने म्हटले आहे की, ‘ आयुष्य हे गणपती बाप्पाच्या सोंडेप्रमाणे लांब आहे… आयुष्यात येणारी संकटे ही त्याचे वाहन असलेल्या उंदराप्रमाणे छोटी आहेत. प्रत्येक क्षण हा मोदकाप्रमाणे गोड आहे…गणपती बाप्पा मोरया…’ विआनची पोस्ट देखील त्याच्याप्रमाणेच गोड आहे. त्याच्या या पोस्टवर युझर्स भरभरून कॉमेन्ट करत आहेत.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)