धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने दिला घटस्फोटाचा धक्क...

धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने दिला घटस्फोटाचा धक्का, क्रिकेटविश्वात खळबळ माजविणारी घटना (Shikhar Dhawan Part Ways With Wife Ayesha; Ayesha Confirms Divorce News On Social Media)

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. त्यांच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. याबाबत खरं तर शिखर धवनने काहीही वाच्यता केलेली नाही, परंतु आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भात लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला दुसऱ्यांदा घटस्फोट झाल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयशा ही आधी घटस्फोटीत होती आणि शिखर सोबत तिचा दुसरा विवाह होता. आपलं लग्न मोडलं असून त्याबाबतच्या अनेक गोष्टी तिने आपल्या पोस्टमध्ये नमुद केल्या आहेत.

माझा पहिला घटस्फोट झाला, तेव्हा मी घाबरले होते

Shikhar Dhawan, Divorce News

आयशाने घटस्फोटाबाबत इन्स्टाग्रामवर लिहिलंय, ” घटस्फोट हा शब्द मला दोनदा घटस्फोट होईपर्यंत घाणेरडा वाटत असे. शब्दांचे किती शक्तिशाली अर्थ आणि संबंध असू शकतात. जेव्हा माझा पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला असे वाटले की मी हरले आहे.”

माझं दुसरं लग्नंही मोडलं..

Shikhar Dhawan, Divorce News

आयेशाने पुढे लिहिले, ”मला वाटले की मी सर्वांना निराश केले आहे, मी स्वार्थीपणे वागू लागले आहे. मला वाटले की, मी माझ्या पालकांना, माझ्या मुलांना निराश केले आहे. आणि काही प्रमाणात मला वाटले की मी देवाचा अपमान केला आहे. घटस्फोट हा माझ्यासाठी खूप घाणेरडा शब्द होता आणि मला पुन्हा याचा सामना करावा लागला आहे. हे सर्व खूप भयंकर आहे.. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. अशा परिस्थितीत जेव्हा माझे दुसरे लग्नही तुटले तेव्हा मी घाबरले. पहिल्या घटस्फोटाच्या वेळी मी ज्या भावनांमधून गेले होते तसेच मला वाटत आहे. भीती, अपयश, निराशा … असं बरंच.”

घटस्फोटाबाबतचे माझे जे विचार होते, ते चुकीचे होते

Shikhar Dhawan, Divorce News

आयेशाने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, आता तिला एक नवीन धैर्य मिळाले आहे. तिने लिहिले, या सर्व भावनांमधून बाहेर पडल्यानंतर मी बसले आणि विचार केला की सर्व काही ठीक आहे. मी माझे सर्वोत्तम दिले. माझी भीती नाहीशी झाली. मला पूर्वीपेक्षा अधिक चांगले वाटू लागले. मला वाटले की, घटस्फोटाबद्दल माझा विचार चुकीचा आहे. यानंतर, आयशाने आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. आयेशाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Shikhar Dhawan, Divorce News

गेल्या वर्षी त्यांच्या नात्यात कुरबुरी सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. एवढेच नाही तर आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे सर्व फोटो डिलीट केले होते, पण आयशाचे फोटो अजूनही धवनच्या अकाऊंटवर आहेत.

शिखर धवनने देखील इंस्टाग्रामवर दिली पोस्ट

Shikhar Dhawan, Divorce News

घटस्फोटाची बातमी इंटरनेटवर व्हायरल होताच शिखर धवननेही इंस्टाग्रामवर आपला जबरदस्त फोटो पोस्ट केला आहे. पण तो घटस्फोटावर काहीच बोलला नाही आणि आयपीएल जर्सीमध्ये त्याच्या चाहत्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास प्रवृत्त करताना तो दिसला, पण कमेंट बॉक्समध्ये लोक त्याला घटस्फोटाबद्दलच सातत्याने प्रश्न विचारत आहेत.

बरंच चर्चिलं गेलं त्यांचं लग्न

Shikhar Dhawan, Divorce News

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांनी २०१२ मध्ये लग्न केले. शिखर धवन आणि आयेशा यांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली. या दोघांना हरभजन सिंगने एकत्र आणले. आयशा शिखरपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. जेव्हा धवन आणि आयशाचे लग्न झाले तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित झाले. पण धवनच्या आईने त्याला साथ दिली. धवन आणि आयेशा यांना जोरावर नावाचा मुलगाही आहे. आयेशाला तिच्या पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत.