गुरु रंधावा – शहनाज गिल यांच्यातील अफलातू...

गुरु रंधावा – शहनाज गिल यांच्यातील अफलातून केमिस्ट्री; त्यांचा ‘तो’ खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Shehnaaz Gill with Guru Randhawa new special video viral on social media)

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ‘बिग बॉस १३’ नंतर जी प्रकाशझोतात आली ती आजपर्यंत सतत चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली. पण आज शहनाज सिद्धार्थच्या आठवणी  जागृत ठेवून आनंदी आयुष्य जगत आहे. एवढंच नाही, तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अभिनेत्री सिद्धार्थचं नाव घ्यायला विसरत नाही.

दरम्यान, शहनाजचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये शहनाज प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत (Guru Randhawa) फोटोशूट करताना दिसत आहे. फोटोशूट करत असताना गुरू आणि शहनाजमध्ये रंगलेली केमिस्ट्री चाहत्यांना देखील प्रचंड आवडली आहे.

खुद्द गुरूने शहनाजसोबतचा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, ‘तुम्हाला फक्त शहनाजला पाहण्याची परवानगी आहे.’ असं लिहिलं आहे. दोघांच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून अनेक लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

एका युजरने कमेंटमध्ये गुरू प्रचंड लाजाळू आहे… असं लिहिलं आहे, तर अन्य एका युजरने ‘शहनाजचा क्यूटनेस कधीही कमी होणार नाही …’ असं लिहिलं आहे. सध्या गुरू आणि शहनाजच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. शहनाजचा आगामी सिनेमा शहनाज लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शहनाजला सिनेमात मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र शहनाजच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहेत.