शहनाज गिल पोहचली लालबागच्या राजाच्या मंडपात: ति...

शहनाज गिल पोहचली लालबागच्या राजाच्या मंडपात: तिथे शहबाजच्या हातावर सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू बघून चाहते झाले भावुक (Shehnaaz Gill Visits Lalbaugcha Raja, Sidharth Shukla’s Face Tattoo On Shehbaz Badesha’s Arm Makes Fans Emotional, See Photo And Video)

पंजाबची कतरिना कैफ अशी ख्याती पावलेली अभिनेत्री शहनाज गिल, आपला भाऊ शहबाज सोबत मुंबईतील सुप्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या मंडपात पोहोचली. याप्रसंगी, शहबाजच्या हातावर सिद्धार्थ शुक्लाचे चित्र गोंदण्यात आलं आहे तिकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं. ते पाहून चाहते भावुक झाले. 

अभिनेत्री व गायिका शहनाज गिलने मस्टर्ड येलो रंगाचा ड्रेस घातला होता. दर्शनासाठी असलेल्या लोकांच्या रांगेत ती आपल्या भावासोबत उभी राहिली होती. अन् आपल्याला कधी एकदा आत प्रवेश मिळतो, याची आतुरतेने वाट पाहत होती.

मंडपाच्या आत प्रवेश करतेवेळी शहनाजने आपला भाऊ शहबाजचा हात धरला होता. शहबाजच्या हातावर गोंदलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या चित्राकडे चाहत्यांचे लक्ष गेले.

अभिनेत्रीने आपल्या भावाचा प्रेमभराने हात धरलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने पसरतो आहे. अन् चाहते सिद्धार्थ बाबतचे आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

एका चाहत्याने कमेंट केली- ब्युटीफूल और प्यारी सोल शहनाज. तर दुसऱ्या एकाने लिहिलं- सिडनाज.

एका चाहत्याने लिहिलं-आमची अत्यंत मौल्यवान स्टार !

शहनाजने गेल्या वर्षी ‘ हौसला रख’ या पंजाबी चित्रपटात दिलजीत दोसांज सोबत नायिकेची भूमिका केली होती. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.