शहनाजचे चिखलातील फोटोशूट वेधून घेतंय सगळ्यांचं ...

शहनाजचे चिखलातील फोटोशूट वेधून घेतंय सगळ्यांचं लक्ष (Shehnaaz Gill takes ‘mud bath’ at construction site)

‘बिग बॉस’ फेम गायिका व पंजाबी कुडी शहनाज गिल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. शहनाजने नुकतेच एक अनोखे फोटोशूट केले आहे. ज्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या फोटोशूटमधील काही फोटो शहनाजने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाज चक्क चिखलात लोळताना दिसत आहे. शहनाजने या फोटोंना “Spa Time #Off Roading” अशी कॅप्शन दिली आहे.

या फोटोंमध्ये शहनाज गिलने मॅचिंग शॉर्ट्ससह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून तिने स्वत:ला चिखलाने माखले आहे.

बांधकाम सुरु असलेल्या साइटच्या ठिकाणी असलेल्या मातीत शहनाजने हे फोटोशूट केलेले दिसत आहे.

शहनाजचा हा हटके अंदाज सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. शिवाय चिखलात लोळूनही तिचं सौंदर्य चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडणारं आहे. या फोटोशूटमुळे चाहत्यांमध्ये शहनाजची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

शहनाज लवकरच ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात झळकणार आहे.

(सर्व फोटो सौजन्य : शहनाज गिल / इन्स्टाग्राम)