शीझान खानचे कोर्टात स्पष्टीकरण, मला उर्दू येत न...

शीझान खानचे कोर्टात स्पष्टीकरण, मला उर्दू येत नाही पण…(Sheezan Khan’s Explanation In Court: I Can’t Speak Urdu But….)

अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवरील मेकअपरुम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे गुढ दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर केस चालू असून दररोज या केसवर वेगवेगळे खुलासे झालेले पाहायला मिळतात.

कोर्टात आज शीझानचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. या सुनावणी दरम्यान शीझानने नव्या गोष्टींचा खुलासा केल्याची माहिती त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी दिली. शीझान तुनिषाला जबरदस्ती हिजाब घालायला लावायचा असा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला होता.

तो फेटाळत वकिलांनी तिने तो हिजाब शूटिंगदरम्यानच्या एका सीनसाठी घातल्याचे सांगितले. तसेच तुनिषाची आई उगीचच या प्रकरणाला लव्ह जिहादचे वळण देत असल्याचेही ते म्हणाले.

 श्रद्धा वालकर हत्याकांडाने मी खूप हादरलो होतो त्यामुळे मी तुनिषासोबत ब्रेकअप केला होता असे शीझानने कोर्टात सांगितले. आथा शीझानने नवे विधान केले आहे. तो म्हणाला की, जर मी मुसलमान नसतो तर कदाचित वाचलो असतो. मला स्वत:ला उर्दू येत नाही मग मी तुनिषाला काय शिकवणार.

शीझानच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार तुनिषा शीझानशिवाय इतर मुलांच्याही संपर्कात होती. ती टिंडर अॅपवर अली नावाच्या मुलाच्या संपर्कात होती. 21 ते 23 डिसेंबर दरम्यान त्यांचे संपर्क चालू होते. तुनिषाच्या आईने हे आरोप फेटाळत अली हा अभिनेत्रीचा जिम ट्रेनर असल्याचे म्हटले आहे.