शिझान खानला जामीन मंजूर, तुनिशा शर्मा आत्महत्या...

शिझान खानला जामीन मंजूर, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात झाली होती अटक (Sheezan Khan Gets Bail In Tunisha Sharma Suicide Case)

24 डिसेंबरला अलीबाबा दास्तान ए काबुल फेम अभिनेत्री तुनिशा शर्माने सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणावरुन तिचा सहकलाकार आणि प्रियकर शिझान खानला अटक करण्यात आली होती. तुनिशाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

तुनिशाचा मृतदेह शिझान खानच्या मेकरुमच्या वॉशरुममध्येच सापडला होता. त्यामुळे त्याच्यावरील संशय आणखी बळावला. त्यानंतर तुनिशाच्या आईने शिझान व त्याच्या कुटुंबाच्या विरोधात अनेक खळबळजनक आऱोप केले.

शिझान व तुनिशा अलीबाबा दास्तान ए काबुल या मालिकेतील प्रमुख कलाकार होते. दोघांची भेट याच मालिकेच्या सेटवर झालेली. पुढे त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. काही महिने डेट केल्यावर त्यांचे ब्रेकअप झाले. शिझानने तुनिशाला फसवल्याचा आरोप तिच्या आईने केला. तेव्हापासून गेले 69 दिवस तो तुरुंगात होता.

मिळालेल्या माहितीनुसार शिझानला वसई कोर्टाने 1 लाख रुपयांच्या बॉण्डवर जामीन दिला आहे. सोबतच तो कुठे बाहेर जाऊ नये यासाठी त्याचा पासपोर्ट जप्त करण्याचा आदेश दिला आहे.