शर्वरी वाघ बॉडी हगिंग ब्लॅक कटआउट ड्रेस घालून ग...

शर्वरी वाघ बॉडी हगिंग ब्लॅक कटआउट ड्रेस घालून गेली पुरस्कार सोहळ्याला, पण लोकांनी केले ट्रोल (Sharvari Wagh Gets Brutally Trolled For Wearing Body Hugging Cutout Dress)

जीक्यू मेन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2022 मध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बंटी-बबली फेम अभिनेत्री शर्वरी वाघने देखील अतिशय स्टायलिश पद्धतीने हजेरी लावली. शर्वरीने या कार्यक्रमासाठी बॉडी हगिंग ब्लॅक कटआउट गाऊन घातला होता.

साइड स्लिट असलेला हा सेक्सी गाऊन अभिनेत्रीला हॉट लुक देत होता. त्यात तिची परफेक्ट फिगर स्पष्ट दिसत होती. कॅमेऱ्याच्या नजरा जरी तिच्यावर खिळल्या असल्या तरी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाहीत.

लोक कमेंट करत आहेत की हा ड्रेस उर्फीचा आहे, एकाने कमेंट केली की आजकाल प्रत्येकजण उर्फीपासून प्रेरित होत आहे…एकाने लिहिले की, प्रत्येकजण उर्फीला शिव्या देतात पण सर्वजण तिच्यासारखेच कपडे घालतात… एकाने तिच्या फोटोवर भयानक अशी कमेंट केली आहे.  लोकांना तिच्या ड्रेसचे साइड कटआउट्स अजिबात आवडले नाहीत.

त्या ड्रेसला पाहून लोकांना उर्फीची आठवण येत आहे. सगळ्यांनाच शर्वरीचा ड्रेस आवडला नाही असे नाही. शर्वरीचे चाहते तिला हॉट अँड फायरचे इमोजीही पोस्ट करत आहेत.

शर्वरीबद्दल सांगायचे तर, तिने हा ड्रेस खूप आत्मविश्वासाने घातला  होता. ती खूपच सुंदर दिसत होती. ड्रेसचा साइड कटआउट तिला हॉट लुक देत होता.  शर्वरी आजकाल विक्की कौशलचा भाऊ सनी कौशलसोबतच्या जवळीकेमुळे चर्चेत आहे.