शर्मिला टागोर ११ वर्षांनंतर दिसणार मोठ्या पडद्य...
शर्मिला टागोर ११ वर्षांनंतर दिसणार मोठ्या पडद्यावर (Sharmila Tagore returns to films after 11 years)

११ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर शर्मिला टागोर (Sharmila Tagore) आता पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत चांगली सुरुवात करत आहेत. ‘गुलमोहर’ असे या चित्रपटाचे नाव असून फॉक्स स्टार स्टुडिओजने चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि ऑटोनॉमस वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राहुल चित्तेला आणि अर्पिता मुखर्जी यांनी लिहिलेल्या या चित्रपटात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar), सूरज शर्मा आणि अभिनेत्री सिमरन ऋषी बग्गा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

शर्मिला टागोर 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रेक के बाद’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटामध्ये शेवटच्या दिसल्या होत्या. आता मोठ्या ब्रेकनंतर त्या गुलमोहर या चित्रपटात दिसणार आहे. इतके दिवस त्या पडद्यापासून दूर असल्या तरी त्यांची फॅन फॉलोइंग आजही कमालीची आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना येत आहेत. या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले असून यावर्षी ऑगस्टमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

गुलमोहर एक कौटुंबिक चित्रपट आहे. ज्याची कथा मल्टी जनरेशन असलेल्या बत्रा कुटुंबाभोवती फिरत राहते. बत्रा कुटुंब त्यांचे पस्तीस वर्ष जुने घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहेत. अशा परिस्थितीत भावुक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील नाती आणखी मजबूत होताना यात दाखवली जाणार आहेत. नात्यांना एका धाग्यात बांधण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे का हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जेव्हा एकमेकांची रहस्य समजल्यामुळे मनात असुरक्षित भावना निर्माण होतात तेव्हा नात्यांचा खरा अर्श समजतो.

शर्मिला टागोर या चित्रपटात बत्रा कुटुंबाची मुख्य सदस्य म्हणजेच कुलमाताची भूमिका साकारत आहे. त्यांच्या मते या प्रोजेक्टचे शूटिंग सेटवरही कौटुंबिक वातावरण निर्माण करणारे होते.
एक काळ असा होता जेव्हा या ‘कश्मीर की कली’चे अनेक चाहते होते. ६०-७० च्या काळात बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. शर्मिला टागोर यांचा अमर प्रेम, अपूर संसार, अॅन इव्हनिंग इन पॅरीस, आ गले लग जा, कश्मीर की कली, चुपके चुपके, मौसम, सावन की घटा, सफर मधील अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. लग्नानंतर मात्र पतौडी खानदानची बहू झाल्यामुळे आणि मुलांच्या संगोपनासाठी शर्मिला टागोर यांनी त्यांचे करिअर सोडून दिले होते. अधून मधून त्या एखाद्या चित्रपटात काम करायच्या. मात्र गेली ११ वर्ष कोणत्याच चित्रपटात त्यांची झलक पाहायला मिळाली नव्हती. आता मात्र तैमूर आणि जेहची आजी शर्मिला टागोर बॉलीवूडला पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ११ वर्षांनंतर शर्मिला बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. अन् पुन्हा एकदा मोठया पडद्यावर शर्मिला टागोरला पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.