शर्मिला टागोर, नाना पाटेकर… इत्यादींना &#...

शर्मिला टागोर, नाना पाटेकर… इत्यादींना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार (Sharmila Tagore, Nana Patekar And Others Honoured With Dinanath Mangeshkar Award)

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान या मान्यवर संस्थेच्या वतीने देण्यात येणारे, २०२० सालचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर आणि संगीतकार प्यारेलाल यांना हे देण्यात येतील. यांच्याबरोबरच गीतकार संतोष आनंद, पार्श्वगायिका मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांना देखील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात आलेले आहेत.

आज मास्टर दीनानाथ यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. करोनाच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर समारंभ करण्यात येणार नाही. तर पुरस्कार प्राप्त कलावंतांना, त्यांच्या घरी जाऊन ते देण्यात येतील.

गेल्या अनेक वर्षांपासून मंगेशकर कुटुंबियांच्या प्रतिष्ठान कडून हे पुरस्कार देण्यात येतात. बॉलिवूड कलावंतांबरोबरच संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.