‘’हा शरद पोंक्षे तूच ना ? ‘’ असे म्हणत आदेश बां...

‘’हा शरद पोंक्षे तूच ना ? ‘’ असे म्हणत आदेश बांदेकरांनी व्यक्त केली नाराजी ( Sharad Ponkshe Ungrateful : Aadesh Bandekar Express His Displeasure )

सध्या राजकारणातील वातावरण गरम असताना त्याचे पडसाद मनोरंजन विश्वात देखील उमटत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यात देखील मतभेद होताना दिसतात.

अशातच आता अभिनेते शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकर यांच्यात वादाची ठिणगी उडाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. तसेच एकनाथ शिंदेंनी केलेल्या मदतीची जाण ठेवत शरद पोंक्षेंनी त्यांच्या ‘दुसरं वादळ’ या पुस्कात त्यांच्यासोबतचा फोटो उल्लेख असल्याचे म्हटले आहे.

पण शरद पोंक्षेंनी केलेले एकनाथ शिंदेंचे कौतुक पाहून आदेश बांदेकर दुखावले गेले आहेत. आदेश बांदेकर यांनी ‘’हा शरद पोंक्षे तूच ना ? ‘’ असा प्रश्न करत त्यांची नाराजी व्यक्त केली. त्यासोबत त्यांनी शरद यांचा आदेशचे कौतुक करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आदेश बांदेकरांच्या बाबतीत शरद पोंक्षे कृतघ्न झाले असा त्यांचा समज झाला आहे.

यावर शरद पोंक्षेनी उत्तर देत , ‘मी आदेश बांदेकर यांचे सुद्धा कौतुक माझ्या नव्या दुसरं वादळ या पुस्तकात केले असल्याचे म्हणत पुराव्यासाठी पुस्तकातल्या एका पानाचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.’ त्या फोटोला शरद यांनी ‘’शरद पोंक्षे कधीही कोणाला विसरत नाही ‘’असे कॅप्शन देत आदेश बांदेकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या या वादाबद्दल शरद पोंक्षेंना विचारले असता, आदेश आणि माझी मैत्री ही फार पूर्वीपासूनची आहे. तो राजकारणात येण्याआधीपासून आम्ही चांगले मित्र आहोत, त्याला मी शिवसेनेमुळे ओळखतो असे नाही. तसेच आमच्यात कोणतेही वाद किंवा मतभेद नाही असे म्हणत या गोष्टीला पूर्णविराम दिला आहे.