वस्त्रसाधन की सौंदर्यप्रसाधन (Shape Body with I...

वस्त्रसाधन की सौंदर्यप्रसाधन (Shape Body with Inner wares)

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणार्‍या तिच्या वक्षस्थळांना साजेसा आधार देणारं वस्त्रसाधन, अर्थात ब्रेसियर वापरणं हे निसर्गतः सर्व स्त्रिया करतच असतात. परंतु, सध्या वस्त्रांच्या गरजेनुसार उपलब्ध असलेल्या ब्रा वापरणं हे स्त्री सौंदर्यात मोलाची भर घालणारं ठरत आहे.

अनादिकालापासून वक्षस्थळं ही स्त्रीच्या सौंदर्याचा मानबिंदू मानली गेली आहेत. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी आपली वक्षस्थळे उभार व मोठी असावीत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि ते स्वाभाविकच आहे. स्तनांचा आकार हा बर्‍याच अंशी आनुवंशिक असतो. अर्थातच आनुवंशिकेतून वाट्याला येणार्‍या स्तनांच्या आकाराला काही अंशी प्रयत्नांनी आपल्याला हवं तसं स्वरूप देता येतं. स्तनांच्या निगेसाठी स्वच्छता व साजेसी आधारपूर्वक वस्त्रसाधनं अर्थात ब्रेसियर्स वापरणं, हे निसर्गतः सर्व स्त्रिया करीतच असतात. परंतु अलीकडे इतक्या तर्‍हेचे कपडे वापरले जातात की त्या त्या ड्रेसेसची गरज म्हणून बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा दिसतात. परंतु त्या कशा व केव्हा वापराव्यात याबाबत सर्वांनाच फारसं ज्ञान असत नाही. अशावेळी कुठलीही चुकीची ब्रा खरेदी करून आपण आपल्या महागातल्या आऊटफिटचं आणि ओघानं आपलंही लूक खराब करू शकतो. तेव्हा खरेदीपूर्वी वेगवेगळ्या ब्रा बद्दल व्यवस्थित जाणून घेऊया. ब्राचे प्रकार

टीनएजर ब्रा
किशोरवयीन मुलींनी आताच ब्रा घालायला सुरुवात केली असेल तर त्यांनी कोणतीही ब्रा विकत घेऊन चालणार नाही. बिगिनर्सनी ‘टीनएजर ब्रा’ चा वापर करावा. ही ब्रा अतिशय हलकी आणि नॉन पॅडेड तसेच नॉनवायर्ड असते. या ब्रामध्ये हुकही नसतो. त्यामुळे सुरुवातीला अतिशय कम्फर्टेबल वाटते. कोणत्याही प्रकारचा दबाव स्तनांवर येत नाही.

टीशर्ट ब्रा
नेहमी जीन्स आणि टॉप घालण्याची सवय असेल तर ‘टीशर्ट ब्रा’ चा वापर करणं योग्य आहे. ही नेहमीच्या ब्रा प्रमाणेच असते फक्त यामध्ये पॅड असतात. ही ब्रा तुमची फिगर अथवा टीशर्ट घातल्यानंतर तुमच्या स्तनांचा आकार योग्य प्रकारे दर्शवते. या ब्रा मध्ये कोणत्याही प्रकारच्या शिलाईचे निशाण दिसत नाहीत आणि समोरच्या बाजूला ब्रा चा शेप अथवा बूब्सचे पॉइण्ट्सदेखील दिसत नाहीत. यामुळेच टाईट फिटेड ड्रेस आणि टॉप्ससाठी ही टीशर्ट ब्रा उत्कृष्ट आहे.

स्पोट्सर्र् ब्रा
फिट राहण्यासाठी नियमित जिम आणि योगा क्लासला जाणे अथवा मॉर्निंग वॉक वा जॉगिंग अशा अ‍ॅक्टिव्हिटीज करण्यासाठी शरीर रिलॅक्स राहणं अत्यंत गरजेचं आहे. अशा स्त्रियांना ‘स्पोर्ट्स ब्रा’ खरोखर आरामदायी ठरते.

स्ट्रॅपलेस ब्रा
वन शोल्डर, ऑफ शोल्डर अथवा कोणत्याही सेक्सी ड्रेससाठी स्ट्रॅप्स नसलेल्या ब्रा चा वापर करता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या स्ट्रॅप्स आपल्याला हवं तेव्हा लावता येतात आणि नको तेव्हा स्ट्रॅप्स काढून या ब्रा चा वापर करता येतो. ‘स्ट्रॅप्सलेस ब्रा’ मध्ये आरामदायक वाटत नसेल तर ब्रा ला स्ट्रॅप्स लावून घालता येते किंवा ट्रान्सपरंट स्ट्रॅप्स लावून ही ब्रा घालता येते. यामुळे तुमच्या सेक्सी ड्रेसचा लूकही बिघडणार नाही आणि तुम्ही अतिशय कम्फर्टेबल राहू शकता.

मिनिमायजर ब्रा
‘मिनिमायजर ब्रा’ विशेषतः त्या मुलींसाठी असते, ज्यांचे स्तन मोठे असतात. मोठ्या स्तनांसाठी मिनिमायजर ब्रा हा एक चांगला पर्याय आहे. वास्तविक ही ब्रा तुमच्या शरीराच्या अतिरिक्त लूज फॅटला लपवते आणि व्यवस्थित शेपमध्ये ठेवण्यास मदत करते. 

चोली ब्रा
‘चोली ब्रा’ चा ट्रेंड अतिशय जुना म्हणजे आपल्या आजी-आईच्या वेळचा आहे. एथनिक वेअर अर्थात् ब्लाऊजच्या आत ही ब्रा घालण्यात येते. या ब्रामुळे स्तनांचा योग्य शेप दिसतो. तसंच या ब्रा मुळे समोरच्या बाजूने छाती थोडी वर आलेली देखील दिसते. पूर्वीच्या काळी महिला या प्रकारच्या ब्रा जास्त घालत होत्या.

कन्व्हर्टिबल ब्रा
सर्व ब्रा मध्ये ही उत्कृष्ट ब्रा आहे.  या ब्राच्या परिवर्तनीय स्ट्रॅप्स हॉल्टर, रेसर बॅक, नव शोल्डर अथवा स्ट्रॅप्सलेसमध्ये बदलता येतात. ही ब्रा अनेक रंगात उपलब्ध असली तरी मुलींना यात न्यूड रंग वापरण्यास जास्त आवडतो.

बॅकलेस ब्रा
बॅकलेस ड्रेसमध्ये ब्रा घालतात की नाही, कशा घालतात आणि कोणत्या ब्रा असतात असे आपल्याला अनेक प्रश्‍न पडतात? बॅकलेस ड्रेस अथवा बॅकलेस ब्लाऊज घालण्यासाठी स्ट्रॅप्सलेस ब्रा चा वापर करण्यात येतो. अर्थात स्ट्रॅप्सलेस ब्रा प्रमाणेच बॅकलेस ब्रा देखील असते. फक्त त्यामध्ये फरक इतकाच असतो की, यामध्ये बॅक स्ट्रॅप्स नसतात अथवा ही संपूर्ण ट्रान्सपरंट असते. ही ब्रा बॅकलेस ड्रेसमध्ये अगदी बिनधास्त घालता येते.

ब्रायडल ब्रा
ही ब्रा खास नववधूसाठी आहे. नवरीच्या सामानामध्ये दिली जाणारी ही ब्रा अतिशय सेक्सी असते. नेट आणि लेस लावलेल्या या ब्रा अनेक तर्‍हेच्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात. आपल्या नवर्‍याला उत्तेजित करण्यासाठी ब्रायडल कलेक्शनमध्ये अशी ब्रा असायलाच हवी.

मॅटर्निटी ब्रा
आई झाल्यानंतर स्तनपान करावं लागतं, त्यामुळे बर्‍याचदा महिला ब्रा घालणं काही काळ बंद करतात. पण त्यामुळे स्तन सैल पडू शकतात. शिवाय काही काळ गेल्यानंतर हे अतिशय खराब दिसतं. त्यामुळे ब्रा घालणं सोडू नका आणि स्तनपान करणंही बंद करू नका. त्याऐवजी गरोदरपणात वापरता येतील अशा ‘मॅटर्निटी ब्रा’ असतात. नुकत्याच आई झालेल्या महिलांसाठी अशा तर्‍हेची ब्रा मुलांना दूध पाजतेवेळी अतिशय सोयीस्कर होते. ही ब्रा कॉटन किंवा सॉफ्ट फॅब्रिकची असते. बाळाला दूध पाजताना काढावी लागणार नाही, अशा तर्‍हेने ही डिझाईन केलेली असते.

पुशअप ब्रा
ज्यांच्या छातीचा आकार छोटा आहे आणि ज्यांना डीप नेक ड्रेस घालण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी ‘पुशअप ब्रा’ हा एक चांगला पर्याय आहे. या ब्रा मध्ये स्तन सुडौल आणि थोडे वरच्या बाजूला दिसतात. सेक्सी ड्रेस घालायचा असल्यास पुशअप ब्रा वापरा.

डेमी ब्रा
प्रत्येक महिलेच्या छातीच्या आकारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे ब्रा कप असतात. ‘डेमी ब्रा’ मध्ये असलेल्या कपला कट-ऑफ असतो. यामुळे छातीचा वरचा भाग उठावदार दिसतो आणि यावर स्ट्रॅप्स लावलेल्या असतात. घरातील फॉर्मल फंक्शन्स आणि पार्टीज्साठी डेमी ब्रा उपयुक्त आहे. लो-कट, वाईड स्कूप अथवा चौकोनी नेकलाईन असे ड्रेस घालताना अशा तर्‍हेच्या डेमी ब्रा वापरा.

फुल कव्हरेज ब्रा
या ब्रा छातीला सर्व बाजूने कव्हर करतात. या ब्रा मुळे अतिशय चांगला आराम मिळतो. आणि बरेचदा या फ्लोरल प्रिंट्समध्ये असतात.

बिल्ट-इन-ब्रा
एखाद्या बनियान अथवा स्पॅगेटीमध्ये ब्रा चे कप लावलेले असतात. ही ब्रा अन्य नॉर्मल ब्रा प्रमाणे वेगळी येत नाही. आजकाल फ्रंट आणि डीप नेक बॅक ड्रेसेससाठीसुद्धा बिल्ट-इन-ब्रा चा उपयोग करण्यात येतो. बर्‍याच मुली ब्लाऊजच्या आतमध्ये या फिट करून घेतात. त्यामुळे मोठ्या गळ्याचे ब्लाऊज असल्यास, स्ट्रॅप्स बाहेर येण्याची शक्यता राहत नाही.

स्टायलिश बॅक ब्रा
‘स्टायलिश बॅक ब्रा’ मध्ये मागच्या बाजूला आकर्षक डिझाईन अथवा नॉट असते. ही ब्रा साधारणतः पूल, बीच अथवा बीच पार्टीसाठी वापरण्यात येते. ब्रा आणि बिकिनी टॉप अशा दोन्ही तर्‍हेने ही वापरता येते. ही नावाप्रमाणेच अतिशय स्टायलिश दिसते. त्यामुळे कुठे बीचवर सुट्टी घालवायला जायचं असल्यास बॅगेमध्ये या स्टायलिश बॅक ब्रा चा पर्याय नक्कीच असायला हवा.

ब्रा घालण्याचं वय…
मुली वयात येण्याच्या सुमारास वाढत्या वक्षस्थळांची जसजशी जाणीव होऊ लागते तसतशा त्या अंतर्मुख होऊ लागतात. चार लोकांत वावरताना त्यांना लाज वाटू लागते. तेव्हा वेळीच आपल्या मुलीला योग्य ब्रा घालण्याची सवय लावली पाहिजे. वास्तविक एखादी मुलगी ही वयाच्या 13 व्या वर्षानंतर ब्रा घालणं सुरू करते. पण प्रत्येक मुलीच्या बाबतीत असं होत नाही. एखाद्या मुलीचं शरीर जास्त हेल्दी असेल आणि वयाच्या आधीच तिचेे स्तन दिसायला लागले तर अशावेळी आपल्या शरीराचा स्तनांचा भाग बॅलन्स करण्यासाठी तिनं ब्रा घालणं गरजेचं आहे. साधारणतः ब्रा चा आकार हा 28 इंचापासून सुरू होतो. आपल्या शरीराच्या अर्थात स्तनांच्या आकाराच्या मापाप्रमाणेच ब्रा घालणं सुरु करायला हवं.

योग्य ब्रा कशी निवडावी?
स्वतःसाठी ब्रा विकत घ्यायची असते तेव्हा आपल्या स्तनांचा योग्य आकार आपल्याला माहीत असायला हवा. तसंच स्तनांच्या खालच्या भागाचा आकारदेखील नीट माहीत असणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी माहीत असल्या की ब्राची योग्य निवड करणं सोपं होतं.

लक्षात ठेवा –
– एखादी ब्रा शरीराला त्रासदायक असेल, त्यामुळे शरीरावर लाल वळ उठत असतील, तर अशी ब्रा वापरू नका.
– एक ब्रा सतत वापरू नका.  ब्रा रोज नीट आणि स्वच्छ धुवायला हवी.
– तसंच रात्री झोपताना नेहमी तुम्ही ब्रा काढूनच झोपावं. दिवसभर कामाने थकल्यानंतर तुमच्या शरीराला मोकळा श्वास घेण्याचीही गरज असते. ब्रा उतरवल्यावर रात्रभर तुमचं शरीर अतिशय रिलॅक्स होतं. मुख्यत्वे टीनएजर असाल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या वयात स्तनांचा आकार हळूहळू वाढत असतो त्यामुळे नेहमी ब्रा घालून ठेवल्यास, त्याचा स्तनांवर वाईट परिणामदेखील होऊ शकतो.
– सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रा अगदी घट्ट अथवा अगदी सैल असू नये.

स्तनाचा सौंदर्याच्या दृष्टीने विचार करत असताना त्यांचं सौंदर्य वृद्धिंगत करणार्‍या बे्रसियर्सना वस्त्रसाधन म्हणण्याऐवजी सौंदर्यप्रसाधन म्हणावयास काहीच हरकत नाही.